शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 13:06 IST

भाजप मध्ये गद्दारी झाल्याने माझा विजय झाला असे तेली यांना वाटत असेल तर ते चूक आहे असेही नाईक म्हणाले. 

कणकवली : विविध निवडणुकीत पाच वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवू नये. जिल्हा बँकेतील सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा राजन तेलींचा पराभव केला आहे. जिल्हा बँकेतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यानी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. आपल्या झालेल्या पराभवानंतर भाजपातील गद्दारांची गय करणार नाही म्हणणाऱ्या राजन तेली यांनी आधी भाजपातील गद्दारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान नूतन जिल्हा बँक संचालक तथा शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले आहे. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे गीतेश कडू, राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, ललित घाडीगांवकर, रिमेश चव्हाण,रुपेश आमडोसकर, तेजस राणे, रोहित राणे, किरण वर्दम, प्रतीक रासम,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले, वैभव नाईक हे जनतेतून दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले आमदार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत आमदारकी मिळालेल्या राजन तेली यांनी वैभव नाईकांवर टीका करू नये. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व्हिक्टर डॉन्टस, विद्याप्रसाद बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत चांगले काम करणार आहोत. महाविकास आघाडीचे आठ संचालक आहेत. जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आम्ही अंकुश ठेवणार आहोत. भाजप मध्ये गद्दारी झाल्याने माझा विजय झाला असे तेली यांना वाटत असेल तर ते चूक आहे असेही नाईक यांनी सांगितले. ते म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघ युवा सेना जिल्हाप्रमुख पदी निवड केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचे आभार मानतो. आगामी काळात कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यात युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना बळकट करणार आहोत, असेही नाईक यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली bankबँकElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना