शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाचा कहर, 27 गावांचा तुटला संपर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 13:08 IST

सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळावारी सकाळपासून पावसाचे पाणी आल्यानं माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे.

सिंधुदुर्ग, दि. 19 -सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळावारी सकाळपासून पावसाचे पाणी आल्यानं माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. शाळेतील विद्यार्थी व  शिक्षक यांनाही या पाण्यामुळे  खोळंबून राहावे  लागले आहे.  मंगळवारी  माणगावचा आठवड्याचा बाजार असल्यामुळे तुफान पावसाचा अनेकांना फटका बसला आहे.हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावर असणा-या गावातील लोकांची पळापळ झाली आहे. कुडाळ-आंबेडकर नगरमध्ये पुराचे पाणी शिरले असून काळसे बागवाडी पाण्याखाली गेली आहे. मालवण तालुक्यातील बागायत, मसुरे-कावा भागात पूरजन्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक अंतर्गत मार्ग ठप्प झाले आहेत.

रत्नागिरी व रायगडला अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, कोकणातील कुडाळ, मालवण, कणकवली, रत्नागिरी, लांजा येथे अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ येत्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याला सलग दुस-या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहनार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना त्यांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.