शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अनेक गावे अंधारात 

By अनंत खं.जाधव | Updated: October 1, 2023 19:17 IST

मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडीशहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून घरावर व मांगरावर  पडल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.तर नेमळे गावात तर गेले पाच दिवस विज पुरवठा खंडित झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. 

कोलगाव ,बांदा ,माडखोल, नेमळे सांगेली गावात वीज वितरणचे पोल तुटून ,विद्युत वाहिन्यां तुटून रस्त्यावर पडल्या आहेत त्यामुळे वीज वितरण ते जवळपास लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. निगुडे मधलीवाडी येथील रामदास काशिनाथ नाईक यांच्या घरावर सागवान चे झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले आहे.

 तर शेर्ले गावात सागर मेस्त्री याच्या घराची मुसळधार पावसात भिंत कोसळून पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.तर आजगांव भोमवडी येथील भिकाजी पांडुरंग मालजी यांच्या मांगरावर काल रात्री माड पडून  अंदाजे  60000/- चे नुकसान झाले आहे. नेमळे येथे झाड पथदीप कोसळले आहेत असे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे सर्व गेले दोन दिवस झालेल्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झाले आहे. शनिवारी आंबोली ,इन्सुली घाटीत झाड पडले होते. ते झाड सार्वजनिक बांधकाम, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दूर केल्याने वाहतूक सुरळीत झाली पडत असलेल्या धुवाधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सावंतवाडी तालुक्यात भात शेती पिकली आहे त्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असे कृषी विभागाने स्पष्ट केले . वीज वितरण चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती उपकार्यकारी अभियंता के. एच चव्हाण यांनी दिली . 

नेमळे गाव पाच दिवस अंधारात 

मुसळधार पडलेल्या पावसामुळे भले मोठे जांभळाचे झाड वीज तारांवर कोसळल्यामुळे नेमळे दोन पोल तुटून नुकसान झाले आहे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज मंडळाकडून प्रयत्न सुरू आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे हे झाड नेमळे-पाटकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर कोसळले होते. ते दुर करण्यात आले. परंतु वीज पुरवठा अद्याप सुरळीत झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीRainपाऊस