शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात कडकडाटासह पाऊस; शिवडाव, कळसुली परिसरात पडल्या गारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 20:36 IST

आधीच कोरोनाचे संकट त्यात अवकाळी पडलेला पाऊस यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. 

सिंधुदुर्गनगरी:  जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. ध्यानीमनी नसताना उन्हाळ्यात अचानक पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा आंबा व काजू पिकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी मात्र पुरता अडचणीत सापडला आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात अवकाळी पडलेला पाऊस यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमालीची उष्णता वाढली आहे. सुमारे ४० डिग्री तापमान होत आहे.  त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गेले काही दिवस गडगडाट होत होता. काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला होता. मात्र तो जोरदार झाला नव्हता. आज सायंकाळी जिल्हयातील बऱ्याच भागात पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. ध्यानीमनी नसताना अगदी उन्हाळ्याच्या तोंडावर पाऊस झाला.

सध्या आंबा व काजूचा सीजन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोरोनामुळे याला मर्यादा आल्या आहेत. आंबा परजिल्ह्यात वाहतुकीस जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंबा व्यावसायिकांना थोडा आर्थिक दिलासा मिळाला होता. परंतु आता अचानक पडलेल्या पावसाने या दोन्ही पिकांना धोका पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार पुरते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

वैभववाडीसह सहयाद्री पट्यात रिमझिम

वैभववाडी परिसरासह सह्याद्री पट्ट्यात रिमझिम अवकाळी पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे हवेत अंशतः गारवा निर्माण झाला. गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर तालुक्यात काहीसे ढगाळ वातावरण दिसून येत होते. हवामान खात्यानेही जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवता होता. त्यानुसार सह्याद्री पट्ट्यात सायंकाळी गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास वैभववाडी परिसरात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे हवेतील उकाड्याची तीव्रता कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. 

शिवडाव, कळसुली परिसरात गारांचा पाऊससायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. शिवडाव, कळसुली येथील परिसरात मोठं मोठ्या गारा पडल्या. त्याचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.