शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

रेल्वेच्या प्रवाशांनीही घेतला धसका

By admin | Updated: August 7, 2016 01:02 IST

गाड्या रिकाम्याच : प्रवासी संख्या रोडावली, आरक्षण कक्षांमध्येही शुकशुकाट

रत्नागिरी : महाडमध्ये पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत झालेली जीवितहानी व पावसाच्या कोसळधारा या पार्श्वभूमीवर एस. टी. व अन्य खासगी वाहनांद्वारे होणारी प्रवासी वाहतूक रोडावली आहे. कोकण रेल्वेकडे हे प्रवासी वळतील अशी शक्यता होती. मात्र, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्यांकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली असून, अनेक रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे. महाडमधील दुर्घटनेची दहशत अद्यापही जनमनावर दिसून येत आहे. मुसळधार पाऊस, तुफानी वारे व महाडची दुर्घटना या सर्वच पार्श्वभूमीवर प्रवासाला बाहेर पडण्यापेक्षा घरीच थांबणे अनेकांनी पसंत केले आहे. महाड-पोलादपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री कोसळून त्यावरून सावित्री नदीत दोन एस. टी.बस व तवेरासह अन्य वाहने कोसळली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मृतदेह शोधण्याचे कार्य अद्यापही सुरूच आहे. ४०पेक्षा अधिक लोक बेपत्ता असून, त्यातील २१ मृतदेह किनाऱ्यांवर, खाड्यांमधून सापडले आहेत. या थरकाप उडविणाऱ्या दुर्घटनेमुळे सारेच धास्तावले आहेत. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच रोडावले आहे. रत्नागिरीतून सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रेल्वेगाडी नेहमीच प्रवाशांनी भरून वाहते. मात्र, महाडच्या पूल दुर्घटनेनंतर या गाडीलाही प्रवासी संख्या रोडावली आहे. सावंतवाडीहून जाणारी राज्यराणी, दिवा पॅसेंजर, मडगाववरून सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही प्रवासी संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. येत्या रविवारी (७ आॅगस्ट) नागपंचमी सण असूनही मुंबईहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात कोसळधारांचे थैमान आहे. नदीनाले भरले आहेत. पूरसदृश स्थिती असल्याने प्रवासाला बाहेर पडणे धोकादायक असल्यानेच प्रवासीसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वेच्या स्थानकांवरील आरक्षण कक्षाकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. आजही या कक्षात शुकशुकाट दिसत होता. एकूणच महाडच्या दुर्घटनेची दहशत कमी होण्यास आठवडाभराचा कालावधी जाणार असल्याचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)मुंबई मार्गावर एस. टी.चेही भारमान घटलेमहामार्गावरून कंटेनरला बंदीवाहतूक शाखेचा निर्णय : मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक सुरुच