शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या त्या विधानाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:28 IST

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध कणकवलीतील काही नागरिकांनी केला आहे. देशवासीय आणि सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्याने राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करीत या नागरिकांनी प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देराहुल गांधींच्या त्या विधानाचा निषेध

कणकवली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध कणकवलीतील काही नागरिकांनी केला आहे. देशवासीय आणि सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्याने राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करीत या नागरिकांनी प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले.यावेळी अ‍ॅड. राहुल तांबोळकर, अखिल आजगावकर, सुरेश देसाई, देवदास करांडे, चेतन पेडणेकर, समीर प्रभुमिराशी, गिरीश चव्हाण, विघ्नेश गोखले, हणमंत इंगळे, कृष्णा बाक्रे, सुनील बाक्रे आदी नागरिक उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, देशातील संवेदनशील अशा बलात्काराच्या घटनांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी १३ डिसेंबर रोजी झारखंड येथील जाहीर सभेमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

भारतामध्ये सध्या महिलांच्याबाबत घडत असलेल्या घटना या अतिशय निंदनीय असून त्या घटनांचे राजकीय भांडवल न करता त्यावर उपाययोजना करण्याची गरज असताना राहुल गांधींसारखे स्वत:ला जबाबदार म्हणणारे नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी या घटनांचा वापर करून अतिशय निंदनीय वक्तव्य जाहीरपणे करीत आहेत.भारतासारख्या महान सांस्कृतिक वारसा असणाºया देशामध्ये बलात्काराच्या घटनांबाबत जाहीरपणे बोलताना रेप इन इंडिया असे संबोधून त्यांनी सर्व भारतीयांचा व प्रामुख्याने देशातील माता भगिनींचा अपमान केला आहे.एवढ्यावरच न थांबता आपल्या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीदेखील अशोभनीय आणि अपमानजनक उद्गार त्यांनी काढले. तसेच माफी मागायला मी राहुल सावरकर नाही असे बोलून आपल्या असंस्कृत व उद्दामपणाचे जाहीर प्रदर्शन त्यांनी दिल्ली येथे जाहीर सभेत बोलताना केले.देशाचे सुजाण नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या या निंदनीय व असंस्कृत, अशोभनीय अशा वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. या वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी. अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीsindhudurgसिंधुदुर्ग