शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मुळस हेवाळे पुलाचा प्रश्न : उपोषण तीन दिवसांनी मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:19 IST

pwd dodamarg sindhudurg- मुळस हेवाळे पुलासाठी गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून ह्यआर या पारह्णची भूमिका घेतली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी बांधकामचे कार्यकारी अभियंता माने यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन मार्चपर्यंत निविदा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देमुळस हेवाळे पुलाचा प्रश्न : उपोषण तीन दिवसांनी मागे निविदा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन

दोडमार्ग : मुळस हेवाळे पुलासाठी गेले तीन दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून ह्यआर या पारह्णची भूमिका घेतली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी बांधकामचे कार्यकारी अभियंता माने यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन मार्चपर्यंत निविदा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.मुळस हेवाळे पुलासाठी ग्रामस्थांची गेल्या वीस वर्षांपासूनची मागणी आहे. मागील काही वर्षांपासून पुलाच्या मागणीला ग्रामस्थांनी जोर लावला होता. अधिकारी व नेत्यांकडून आश्वासनांची आमिषे दाखविण्यात येत होती. त्यामुळे सुसज्ज पूल स्वप्न लवकरात लवकर साकार होईल या आशेवर ग्रामस्थ होते.गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत सध्या असलेला लहान कॉजवे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. कॉजवे वाहून गेला याठिकाणीच ग्रामस्थानी दोन-तीन महिन्यांपूर्वी उपोषण छेडले होते. यावेळी तिलारी पाटबंधारे विभागाने ज्याठिकाणी कॉजवे वाहून गेला तेथे काँक्रीट टाकून रहदारी सुरू राहील, अशी व्यवस्था करणार असल्याचे लेखी पात्र दिले होते. मात्र, वाहून गेलेला कॉजवे ह्यजैसे थेह्ण आहे.नाबार्ड अंतर्गत पुलाला मंजुरी मिळून निधी बांधकामकडे वर्ग करण्यात आला. मात्र, बांधकाम विभागाची कार्यवाही धिम्यागतीने चालू असल्याने अद्याप निविदा अपूर्ण आहे. याबाबत ग्रामस्थांनी शनिवारी मुळस येथे उपोषण केले. हे उपोषण तीन दिवस चालले मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.उपअभियंता चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, शैलेश दळवी, राजेंद्र निंबाळकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेरकर, राष्ट्रवादी जिल्हा कमिटी अध्यक्ष बाबा खतीब हे उपस्थित होते.अभियंत्यांनी दिली भेटमंगळवारपर्यंत दखल न घेतल्यास रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी जलसमाधी किंवा रास्ता रोको करण्याचा निर्धार केला होता. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने यांनी उपोषणस्थळी यांनी भेट दिली. मार्च २०२१ पर्यंत पुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने एक महिन्यासाठी उपोषणाला स्थगिती देत असल्याचे उपोषणकर्ते दत्ताराम देसाई, सचिन देसाई व उदय जाधव यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग