शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अध्यक्षांसह २१ जणांना धक्का

By admin | Updated: October 6, 2016 01:15 IST

जिल्हा परिषद आरक्षण : संग्राम प्रभुगावकर, दिलीप रावराणे यांच्यासह सर्वांना शोधावा लागेल नवीन मतदारसंघ

सिंधुदुर्गनगरी : पुढील वर्षी होणारी जिल्हा परिषद निवडणूक ५० गटांची आरक्षण सोडतीत प्रभाग आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांंना धक्का बसला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यासह २१ विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना नवे मतदारसंघ शोधावे लागणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी शरदचंद्र शिरोडकर, आदी उपस्थित होते. आरक्षण कोणत्या पद्धतीने काढले जाणार आहे. याचे विवेचन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. यामध्ये सुरुवातीला अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जातनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होणार असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांसह दिग्गज सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली होती. आरक्षण जसजसे जाहीर होत होते तसे दिग्गजांना धक्का बसत होता. (प्रतिनिधी)यांना बसला फटका बुधवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सभापती दिलीप रावराणे, अंकुश जाधव, आत्माराम पालेकर, संदेश सावंत, सतीश सावंत, दीपलक्ष्मी पडते, रणजित देसाई, सदाशिव ओगले, जान्हवी सावंत, प्रकाश कवठणकर, समीर नाईक, सुरेश ढवळ, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, पंढरीनाथ राऊळ, भगवान फाटक, वंदना किनळेकर ,रेवती राणे, अनिल कांदळकर, धोंडू पवार यांचा समावेश आहे.यांना निवडणूक लढविण्याची संधीआरक्षण काही इच्छुकांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते. त्यात देवगडचे जनार्दन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, फोंडा मतदारसंघाचे मधुसुदन बांदिवडेकर, कळसुुली मतदारसंघातून सुगंधा दळवी, निकिता परब, स्नेहलता चोरगे, रमाकांत ताम्हणेकर, दादा कुबल, विकास कुडाळकर, अमरसेन सावंत, आबा मुंज (आंब्रड) यांना निवडणूक लढविण्याची संधी आहे.