शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गणेशोत्सवात पूजनासाठी पुरोहितांची तारांबळ

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

समस्या : भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटतेय

मिलिंद पारकर - कणकवली -गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पुरोहितांची आवश्यकता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी घरोघरी होणाऱ्या गणेश पूजनासाठी जाताना पुरोहितांची तारांबळ उडते. दिवसेंदिवस पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्याने पहाटेपासून रात्रीपर्यंत पहिल्या दिवसाचे गणेशपूजन करण्याची वेळ येते. गणेश पूजनाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरच्या गणपतीची पूजा व्हावी यासाठी प्रत्येकजण आधीपासून गावातील भटजींना ‘आमच्याकडे आधी’ असे सांगून ठेवतो. तरीही सर्वांकडेच गणेशपूजन करायचे असल्याने पुरोहितांची दमछाक होते. प्रत्येकजण आपल्याकडे पुरोहितांना घेऊन जाण्यासाठी टपून असतो. यातून भटजींची पळवापळवी होते. प्रथेनुसार प्रत्येक ठिकाणी गावच्या ब्राम्हणांकडून गणेशपूजन केले जाते. मात्र, गावातील पुरोहितांना गणेश पूजनासाठी पहाटेपासून पूजेला सुरूवात करावी लागते आणि सायंकाळपर्यंत घरोघर फिरून गणेशपूजन पार पाडावे लागते.जिल्ह्यात वे. मू. बाळकृष्ण कापडी वेदपाठशाळा, वागदे, वे.मू.मुरवणे गुरूजी वेदपाठशाळा, वायंगणी, दाभोली येथील पूर्णानंद स्वामी मठ, वासुदेवानंद सरस्वती वेदपाठशाळा, साळगांव, टेंबेस्वामी पाठशाळा माणगांव, सावंतवाडी संस्कृत वेद पाठ शाळा या जिल्ह्यातील वेदपाठशाळांमधून एकूण ६० ते ७० विद्यार्थी भिक्षुकीचे शिक्षण घेतात. गणेश पूजनासाठी ब्राम्हणांची आयातगणेशोत्सवात पूजनासाठी ब्राम्हणांची मोठी कमतरता जाणवते. पहाटे अगदी ३ वाजल्यापासून पूजा सुरू करतात. तेव्हा कुठे सायंकाळपर्यंत गावातील पूजा आटोपतात. जिल्ह्यात सगळीकडेच ही कमतरता भरून काढण्यासाठी मग जिल्ह्याबाहेरून पुरोहित मागवले जातात. ग्रामपुरोहिताच्या हाताखाली हे पुरोहित काम करतात. नृसिंहवाडी आदी भागातून पुरोहित जिल्ह्यात दाखल होतात. भिक्षुकीपासून दूरब्राम्हण समाजातील नव्या पिढीतील मुले पारंपरिक भिक्षुकीचे शिक्षण घेण्यापेक्षा आता शाळा, कॉलेज करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. भिक्षुकीमधून उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकतो. परंतु भिक्षुकी करणाऱ्या मुलांकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तसेच पौरोहित्य करणाऱ्याला राजाश्रय मिळत नाही. विवाहासाठी मुलींकडून भिक्षुकी करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात नाही. ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे भिक्षुकी करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. विवाहप्रसंगी अशा मुलांना मुलींकडून पसंती मिळत नाही. पौरोहित्याला राजाश्रय मिळत नाही. धार्मिकतेकडून भौतिकतेकडे ओढ यामुळे तरूण पिढी भिक्षुकीपासून दुरावत आहे.- बाळकृष्ण कापडे, वे. मूर्ती, वागदे