दीपक तारी - शिवापूरकुडाळ तालुक्यापासून ३० किलोमीटर अंतरावर असणारे व स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतर विकासाच्या मार्गावर असणारे तसेच काही योजनांपासून वंचित असणारे गाव म्हणजे पुळास होय. स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही या गावाने आपल्या गावात एसटीचे तोंडही पाहिलेले नाही. या गावाची लोकसंख्या ८३० असून ७ सदस्यी स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत १९७४ साली स्थापन झाली. या गावामध्ये वरचीवाडी, बाबरवाडी, निकमवाडी, धनगरवाडी, गावठणवाडी, हरिजनवाडी, बिब्याचीवाडी अशा आठ वाड्या आहेत. शैक्षणिकदृष्ट्या विचार केला असता, या गावामध्ये पहिली ते चौथीच्या दोन प्राथमिक शाळा आणि दोन अंगणवाड्या आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन नळपाणी योजना व १२ विहिरी आहेत. सुरुवातीला हा भाग जनता दलाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर शिवसेना व सध्या गावात नारायण राणे समर्थक काँग्रेसची सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे. जनतादल तसेच सध्याच्या काँग्रेस आघाडीने बऱ्याच सरकारी योजना दिल्या. परंतु अद्यापही बऱ्याच मुलभूत गरजांपासून पुळास गाव वंचित आहे. वाहतूक सुविधापुळास गावाची रचना ही माणगाव-शिवापूर रस्त्याच्या समांतर असल्याने या गावातील लोकांना उपवडे, चाफेली, निळेली, महादेवाचे केरवडे व वाडोस या ठिकाणी एसटी बस पकडण्यासाठी यावे लागते. त्यामुळेच या गावाने स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही आपल्या गावात एसटीचे तोंड पाहिलेले नाही. परंतु या गावातील लोक बाजारहाटासाठी दुकानवाड, माणगाव, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी जातात. तसेच या गावातील विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, वा. स. विद्यालय, माणगाव व वाडोस या ठिकाणी जातात. जर शासनाच्या परिवहन विभागाने सावंतवाडी- पुळासमार्गे उपवडे, वसोली, वीरवाडी, सावंतवाडी-मोरे-पुळास, हळदीचे नेरूर हायस्कूल, कुडाळ- माणगाव कांदुळी- मोरे- पुळास बाबरवाडी करून फुटब्रीज अशी बससेवा केली, तर ग्रामस्थांसहीत विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकतो.विकासासाठी नियोजनाची गरजगावातील नादुरूस्त झालेले रस्ते दुरुस्त करण्याची तसेच पुळासमधील नागरिकांना दळणवळणाकरिता एसटीची सोय होण्याचीही गरज भासत आहे. गावामध्ये असलेल्या धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून कॅनॉलने पाणी सोडल्यास गाव सधन होईल व पुळासमधील शेतकरीही खुष होतील. यासाठी शासनस्तरावरुनही पाहिजे तसा प्रतिसाद लाभणे गरजेचे आहे.-तसेच शासनाच्या पाटबंधारे विभागामार्फत पुळास येथे लघुपाटबंधारेचे धरण आहे. -या धरणात विपुल पाणी आहे. परंतु या योजनेची पाईप लाईन चोकअप आहे. -सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावाही केला आहे.-त्यावेळी पाईपलाईन दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले. यासाठी अर्धगोल पाईप टाकण्यात आले. परंतु नंतर या कामाला गती मिळालीच नाही. -एकंदर या धरणाच्या पाईप लाईनमध्ये गोंधळ असल्याने ग्रामस्थांमध्ये संशय आहे. -पुळास गावाला सुमारे १६ किलोमीटरवरील माणगाव आरोग्य कें द्राचाच आधार आहे.-पावसाळ्याच्या दिवसात तर पुळास ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.-एकतर गावात क ोणतीही वाहतूक सुविधा नाही. -पुळास गावामध्ये इयत्ता पहिली व चौथीपर्यंतच्या दोन प्राथमिक शाळा, दोन अंगणवाड्या असून एकंदरीत शैक्षणिक वातावरण चांगले आहे. - जिल्हा परिषदेच्या गावात दोन नळपाणी योजना आहेत. गावात आठ वाड्यात १२ विहिरी आहेत
पुळास विकासापासून दूर---लोकमत विशेष
By admin | Updated: July 21, 2014 23:21 IST