शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या दडपशाहीचा निषेध, शिवसेनेचा येत्या मंगळवारी कुडाळमधील एसीबी कार्यालयावर मोर्चा

By सुधीर राणे | Updated: October 13, 2022 18:33 IST

आमदार वैभव नाईक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्यावतीने कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले आमदार, खासदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी यांच्यावर सरकारने सुडाची कारवाई सुरू केली आहे. यात आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच आमदार नाईक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्यावतीने कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. १८) हा मोर्चा कुडाळ शिवसेना कार्यालयाकडून सकाळी ११ वाजता निघेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक यांच्यासह अतुल रावराणे, विभागीय समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नीलम सावंत, कन्हैया पारकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राऊत म्‍हणाले, राज्‍यात सत्तांतर झाल्‍यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने शिवसेना आणि राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर, नेत्‍यांवर सूडाने कारवाई सुरू केली आहे. एकही गुन्हा नोंद नसलेले शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक विजय साळवी, तर गेली पाच वर्षे पोलीस संरक्षणात असलेले नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम.के. मडवी आदींना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने आतापर्यंत ईडी, सीबीआय, आयटी आदी यंत्रणांचा विरोधकांना त्रास देण्यासाठी वापर केला. आता एन्टी करप्शन ब्युरो ही यंत्रणा कामाला लावली आहे.शिवसेना अशा कारवाईंना घाबरणार नाही. मात्र, या प्रवृत्तीचा आम्‍ही लोकशाही मार्गाने निषेध करणार आहोत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जाईल. आमदार वैभव नाईक यांच्यावर सुरू केलेल्‍या कारवाईचा निषेध आणि त्यांना समर्थन देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे असेही आवाहन राऊत यांनी यावेळी केले.न्यायालयाचे आभार !मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव आणून ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. पण राजीनामा मंजूर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला असून त्याबद्दल न्यायालयाचे आम्ही आभार मानतो असेही खासदार राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक Vinayak Rautविनायक राऊत