शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक, कामगार संस्थेने पारदर्शीपणा सिध्द करावा

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

समविचारी मंच : नोंदणी शुल्क भरल्यानंतर काहीच न कळवल्याने संभ्रम

रत्नागिरी : बेरोजगारांच्या फसवणुकीचा अवलंब करीत एकामागोमाग एक प्रकार रत्नागिरीत उघड होत असतानाच सुरक्षारक्षक भरती आणि सेवा देणाऱ्या एका संस्थेचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न समविचारी मंचने केल्याने संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या संस्थेने आपले पारदर्शक कामकाज जाहीर करावे, अशी मागणी समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये, जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, तालुकाध्यक्ष संजय नागवेकर, सरचिटणीस तुकाराम दुड्ये, युवा आघाडीप्रमुख नीलेश आखाडे यानी केली आहे.राज्य सुरक्षारक्षक अ‍ॅण्ड जनरल कामगार युनियन, मुंबई या नावाने रत्नागिरी कुवारबाव येथे सुमारे दोन वर्षे संलग्न कार्यालय सुरु आहे. स्थानिक बेरोजगारांनी समविचारींशी संपर्क साधून रत्नागिरी शाखेविषयीच्या आपल्या तक्रारी मांडल्या. त्यानुसार, प्रत्येक बेरोजगार युवकाकडून तीनशे रुपये प्रवेशशुल्क वसूल करण्यात येते. सुरक्षारक्षकाची सेवा पुरवण्याची तोंडी हमी देऊन उमेदवारांना लेखी, तोंडी, परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि इतर सेवा शर्ती पूर्ण केल्यावर सेवा देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे संबंधित उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले.कुवारबाव येथील कार्यालयात समविचारींनी संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज आणि सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी धडक मारली. त्यावेळी हे कार्यालय मागील आठवडाभर बंद आहे.कार्यालयाच्या अनियमीत कामकाजामुळे अनेक बेरोजगारांना पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. अनेक बेरोजगारांनी नोंदणी शुल्क भरुन गेले कित्येक महिने आम्हा बेरोजगारांना कोणतीही परीक्षा वा इतर काहीच न कळवल्याने या संस्थेविषयी संशयाची भावना निर्माण झाली असल्याचे ढोल्ये यांनी यावेळी सांगितले.बंद कार्यालयावरील नमूद असलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच कार्यालय उघडण्याची परवानगी मला नाही, असे सांगून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे संपर्क नंबर दिले. यावेळी या कार्यालयाविषयी असणारे आक्षेपांचे निराकरण करून संस्था कार्यपद्धती, पुरविलेले रोजगार, सदस्य संख्या शासकीय मान्यता, नोंदणीची सत्यता याविषयीचे शंका निरसन येत्या आठवड्यात करावे अन्यथा कार्यालय चालू करु देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, युवा प्रमुख नीलेश आखाडे यांनी यावेळी दिला.समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये यांनी या संस्थेविषयी आलेल्या तक्रारींची शहानिशा झालीच पाहिजे, असे सांगून स्थानिक उमेदवारांच्यावतीने आम्ही जरुर पडल्यास पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पत्र दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)