शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : राज्यात ६ महिन्यांसाठी मालमत्ता करमाफी जाहीर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:33 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मासिक ैबजेट' कोलमडले असल्यामुळे, राज्यात ६ महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराची भरपाई म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी सुचनाही आमदार डावखरे यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.

ठळक मुद्देराज्यात ६ महिन्यांसाठी मालमत्ता करमाफी जाहीर करावीआमदार निरंजन डावखरे यांची मागणी

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मासिक ैबजेट' कोलमडले असल्यामुळे, राज्यात ६ महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराची भरपाई म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी सुचनाही आमदार डावखरे यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.भाड्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंकडून होणारी घरभाडे वसुली किमान ३ महिने पुढे ढकलण्याची सुचना राज्य सरकारने घरमालकांना केली आहे. त्याचबरोबर घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, असे निर्देशही दिले आहेत. राज्य सरकारच्या स्वागतार्ह सुचनेमुळे भाडेकरूंना मोठा दिलासा मिळाला.कोविड-१९ मुळे भाडेकरूंप्रमाणेच घरमालकांनाही फटका बसला आहे. सर्वच घटकांचे मासिक उत्पन्न घटले असल्यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सर्व मालमत्तांवर ६ महिने करमाफ करण्याचे आदेश दिल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

मालमत्ता करमाफी दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी सुविधा देताना अडचण होईल. त्यामुळे राज्य सरकारने मालमत्ता कराची रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना अदा करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गNiranjan Davkhareनिरंजन डावखरे