शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

बंदीतही लक्ष्य वसुलीचेच!

By admin | Updated: June 3, 2015 01:15 IST

वाळू उत्खनन : करोडोच्या उत्पन्नावर अनेकांच्या नजरा

खेड : जिल्ह्यामध्ये गौण खनिज उत्खननावर न्यायालयाने बंदी घातली. गाडगीळ समितीने येथील पर्यावरणाला पोषक असे वातावरण उत्खननामुळे बिघडू शकेल असा अहवाल दिला. शासनाने घातलेली बंदी झुगारून खेड तालुक्यात चोरटी व बेकायदा वाळू उपसा केला जात असून, या प्रकरणी महसूल खात्याने कानावर हात घेतले आहेत. कोकणातील वाळू व्यावसायिकांचा रेटा व राजकीय आस्थेपोटी वाळूवरील बंदी उठविण्यात आली. यामुळे कोकणातील गौण खनिज उत्खननातून सरकारला आता लाखो रूपयांचे चलन सुरू होणार आहे. याचाच लाभ उठवित आता खेडमधील वाळू व्यावसायिकांनी मात्र उत्खननास जोरदार सुरूवात केली आहे.खेड तहसील कार्यालयाने तब्बल १ कोटी ३२ लाख ८१ हजार एवढी विक्रमी वसुलीही केली आहे. या आर्थिक वर्षात गौणखनिज, शासकीय वसुली, आणि थकबाकी दंड, अर्ज, भूपृष्ठ भाडे आदिपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यातील खेड आणि दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेबर २०१४ अखेर ७७ आणि ५२ टक्के उद्दीष्टपूर्ती केली आहे. उर्वरीत तालुक्यांची उद्दीष्टपूर्ती झालीच नाही.डिसेंबर २०१४ अखेर वसुलीमध्ये खेड तहसीलदार कार्यालयाने लिह्यात अव्वल स्थान राखले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मंडगणड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये गौण खनिजांवरील बंदी याअगोदरच उठविण्यात आली आहे. उर्वरीत लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूणबरोबरच खेड तालुक्यातही डिसेंबरमध्ये ही बंदी उठवण्यात आली आहे. असे असले तरीही प्रत्यक्षात ती मे महिन्यापासूनच अंमलात येत आहे.आतापर्यंत वाळू उत्खननाला बंदी असल्यामुळे चोरट्या वाळू उत्खननावर कारवाई करून तहसील कार्यालयाने आपली उद्दिष्टपूर्ती केली. आता वाळूवरील बंदी सरकारने उठवल्याने वाळूचा लिलाव केला जाईल. जिल्हा प्रशासनाचा करोडो रूपयांचा बुडालेला महसूल आता पूर्ववत वसूल करता येणार आहे. त्यामुळे बंदी असतानाही आणि बंदी नसतानाही महसुलाचे उद्दिष्ट खेड तालुक्याते पूर्ण केले आहे.खेड तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी या उद्दीष्ट पूर्ततेसाठी केलेले कामाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. याहीपुढील काळात महसुलाचे सरकारी उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, अशीच भूमिका कर्मचारी मांडत आहेत. (प्रतिनिधी)