शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शोधमोहिमेत अडचणी --जिल्हाधिकारी

By admin | Updated: August 6, 2016 00:25 IST

आंजर्ले समुद्रकिनारी, म्हाप्रळखाडी आणि आंबेत येथे एकूण चार मृतदेह होते

रत्नागिरी : स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने म्हाप्रळ आणि आंबेतमध्ये शोधमोहीम राबवण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र प्रचंड पाऊस आणि खाडीचे वाढलेले पाणी यामुळे या मोहिमेला खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत एनडीआरएफच्या दोन बोटींच्या सहाय्याने बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ‘लोकमत’ला दिली. आज दिवसभरात आंबेत येथे तीन आणि म्हाप्रळ येथे एक असे एकूण चार मृतदेह सापडले आहेत. स्थानिक ग्रामस्थ तसेच मच्छिमारांच्या सहायाने जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग आणि खाड्यांची वाढलेली पातळी यामुळे शोध कार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे येत होते. ही परिस्थिती पाहून स्थानिक मच्छिमारांनीही आपल्या बोटी समुद्रात घालण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफकडे विनंती केल्याने त्यांनी दोन बोटी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या या बोटींच्या सहायाने शोधमोहीम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सांगित मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटून झालेल्या अपघातात जिल्ह्यातील ४० जण बेपत्ता झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली असून त्यापैकी आज तीन मृतदेह आंबेत येथे तर एक मृतदेह म्हाप्रळ येथे सापडला. काल आंजर्ले समुद्रकिनारी, म्हाप्रळखाडी आणि आंबेत येथे एकूण चार मृतदेह होते. बेपत्ता लोकांपैकी आठजणांचे मृतदेह आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आहेत. सद्यस्थितीत शोधमोहीम राबवण्याऐवजी मृतदेह वाहून जाताना दिसत आहे का, याकडे लक्ष ठेवण्यावर भर देण्यात येत आहमुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटल्याने यावरून अनेक वाहने वाहून गेली. त्यात रत्नागिरीतील जयगड - मुंबई आणि राजापूर - बोरीवली या दोन बस आणि एक खासगी तवेरा गाडीचा समावेश होता. यातून प्रवास करणारे एकूण ४० प्रवासी बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार जयगड-मुंबई या बसमधील प्रवासी चालक - वाहकासह एकूण १२ जण होते. त्यापैकी श्रीकांत शामराव कांबळे (५८, सावर्डा पोलीस लाईन, चिपळूण) यांचा आंजर्ले येथे तर सुनील महादेव बैकर (३५, सत्कोंडी-रत्नागिरी) यांचा आंबेत येथे मृतदेह सापडला. राजापूर-बोरिवली या बसमधील एकूण १९ प्रवाशांपैकी जयेश गोपाळ बाणे (३६, बाणेवाडी-सोलगाव, राजापूर) यांचा मृतदेह काल म्हाप्रळ येथे सापडला होता.आज जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात चारजणांचे मृतदेह सापडले. त्यात मंडणगड तालुक्याच्या नजीक असणाऱ्या आंबेत येथे जयगड मुंबई बसमध्ये असलेल्या अनिश संतोष बलेकर (१२, सत्कोंडी-रत्नागिरी) याचा तर राजापूर बोरिवली बसमध्ये असलेले भिकाजी वाघधरे (७४, जोगेश्वरी, मुंबई) आणि संतोष गवताडे (३६, नालासोपारा) अशा तिघांचे मृतदेह सापडले. तसेच राजापूर बोरिवली बसमध्ये असलेल्या आसिफ मेमन चौगुले (काविळतळी, चिपळूण) यांचा मृतदेह म्हाप्रळ येथे सापडला. (प्रतिनिधी)मृतदेह वाहून गेले?आज शुक्रवारी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाच्या परिसरात पुलाखालून वाहून जाणारी सहा ते आठ मृतदेह दोन्ही गावातील ग्रामस्थांना दिसले. मात्र पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने आणि यंत्रसामुग्री नसल्याने सर्व मृतदेह लिपनी वावे या रायगड जिल्ह्यातील गावांच्या हद्दीत वाहून गेली़