शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळातील गुणवंत कलाकारांमुळेच स्पर्धेचा डोलारा पेलणे शक्य, शेखर चन्ने यांचे गौरवोद्गार

By सुधीर राणे | Updated: April 22, 2023 14:04 IST

कणकवली येथे एसटीच्या नाट्यस्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 

कणकवली : नाटक हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. एखादी नाट्यस्पर्धा ५० वर्षे सातत्याने घेणे ही साधी गोष्ट नाही. राज्य परिवहन महामंडळ हे करू शकत नाही.पण या महामंडळातील अनेक  कर्मचारी गुणवंत कलाकार असून त्यांच्यामुळेच स्पर्धेचा हा डोलारा पेलणे शक्य होत आहे.असे गौरवोद्गार राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काढले.महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५० व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा २०२२ - २३ चा बक्षीस वितरण समारंभ व राज्य परिवहन  महामंडळाच्या कबड्डी संघाचा सत्कार समारंभ शुक्रवारी कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी  'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अण्णा नाईक ही भूमिका करणारे अभिनेते माधव अभ्यंकर,राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी , नाट्य लेखक विलास खानोलकर,सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी व्ही.एस. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.शेखर चन्ने म्हणाले, कोकणच्या मातीत अनेक कलाकार आहेत. तसेच कलाप्रेमी माणसेही आहेत. कोकणातील अनेक कलाकार एसटी महामंडळात कार्यरत आहेत.त्यामुळे चार वर्षे आंतर विभागीय नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या संघाला प्रथम क्रमांक मिळत आहे.त्यामुळेच महामंडळाच्या परंपरेप्रमाणे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कणकवली येथे होत आहे. महामंडळातील कलाकारांनी आपली कला जिवंत ठेवून आपल्याबरोबरच महामंडळाचे नाव उज्वल करावे, असेही ते म्हणाले.विलास खानोलकर म्हणाले, 'दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो' या माझ्या नाटकाला न्याय देण्याचे काम रंगकर्मी सुहास वरूणकर व त्यांच्या कलाकारांच्या टीमने केले आहे. त्यामुळे मला पुन्हा नाटक लिहायची प्रेरणा मिळाली आहे.त्यामुळे लवकरच माझे दुसरे नाटक आपल्यासमोर येईल.असेही ते म्हणाले. पारितोषिक वितरण समारंभानंतर दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग