आॅनलाईन लोकमतसावंतवाडी : धुळे येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी गुरुवारी एक दिवसाचा बंद पुकारुन या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. या बंदला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी डॉक्टर असोसिएशनतर्फे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना बंदबाबतचे निवेदन दिले. एखादा रुग्ण गंभीर असेल, तर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करुया, मात्र खासगी रुग्णालयातील रुग्ण सेवा पूर्णपणे बंद राहतील, असा इशारा तालुका असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी दिला आहे. यावेळी डॉ. अमुल पावसकर, डॉ. रेवण खटावकर, डॉ. शंतनू तेंडूलकर, डॉ. विनायक लेले आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गात खासगी डॉक्टरांचा बंद
By admin | Updated: March 23, 2017 16:39 IST