कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठविलेले भेटकार्ड व रेखाटलेल्या चित्राबद्दल कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी सिध्दांत राजाराम नेरूरकर याचे पंतप्रधान मोदींनी पत्र पाठवून आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याविषयी वर्गात चर्चा सुरू असतानाच मोदींचे चित्र रेखाटून त्यांना शुभेच्छा देण्याची कल्पना सिध्दांतच्या मनात आली. त्याच्या या कल्पनेला कलाशिक्षक आनंद मेस्त्री यांनीही प्रोत्साहन दिले. सिध्दांतने मोदींचे चित्र रेखाटून पंतप्रधान कार्यालयात पाठविले. देशसेवेच्या कार्यात व्यस्त असलेल्या नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा मिळताच स्वत:च्या स्वाक्षरीचे आभारपत्र पाठविले. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या सिध्दांतला चित्रकलेसह गायनाचीही आवड आहे. पंतप्रधानांनी एका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्यार् पत्राला उत्तर दिल्याने सिध्दांतला प्रोत्साहन मिळाले आहे. (प्रतिनिधी)
वाढदिवसाच्या भेटकार्डला पंतप्रधानांनी दिली दाद
By admin | Updated: November 14, 2014 00:14 IST