शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वेटरची नोकरी करत प्रथमेश बारावी पास

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रथमेश याच्या घरात कमावते कोणी नाही. त्यात दोन बहिणींची लग्न आणि

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील प्रथमेश जयवंत आमकर या विद्यार्थ्याने हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत बारावीची परीक्षा दिली. यामध्ये त्याने ६१ टक्के गुण मिळवून तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रथमेश याच्या घरात कमावते कोणी नाही. त्यात दोन बहिणींची लग्न आणि दोन भावांचे शिक्षण यामुळे प्रथमेशला दहावीनंतर पुढील शिक्षणाला पाठवायचे की नाही, असा प्रश्न त्याच्या वडिलांसमोर उभा राहिला. प्रथमेश हुशार होता. घरच्या प्रतिकूल परिस्थितीतही दहावीत त्याने ७० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे ठरविले. दहावीनंतर पुढचे शिक्षण घ्यायचे तर धामणीपासून ८ किमीवर जायचे. यासाठी गाडी खर्च आलाच व इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. त्याने धामणी येथील हॉटेल सनराईजमध्ये वेटरची नोकरी पत्करली. कॉलेज सुटल्यानंतर तो थेट हॉटेलमध्ये यायचा. तेथे रात्री उशिरापर्यंत काम करायचा आणि नंतर घरी यायचा. या धावपळीत अभ्यासाला वेळ कमीच मिळायचा. पहाटे लवकर उठून प्रथमेश अभ्यास करायचा. ग्राहकांकडून मिळणारी टीप व पगार यात काटकसरीने आपला शैक्षणिक खर्च करीत असे. अखेर जिद्दीच्या जोरावर त्याने बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ६१ टक्के गुण मिळवले. आता पुढील शिक्षणासाठी देवरुख किंवा रत्नागिरी शहराच्या ठिकाणी जायचे म्हटले तर नोकरी करुन ते कितपत शक्य होईल, याबाबत प्रथमेश साशंक आहे. (वार्ताहर)