शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी बस स्थानकाच्या इमारतीचा अद्यावत आराखडा तयार करा, मंत्री केसरकरांच्या सूचना 

By अनंत खं.जाधव | Updated: August 12, 2023 12:00 IST

पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र सध्या एसटी आगाराचे अर्धवट काम झाले

सावंतवाडी : सावंतवाडी आणि वेंगुर्ले एसटी महामंडळाच्या आगाराची इमारत जलदगतीने उभी राहिली पाहिजे त्यासाठी अद्यावत आराखडा तयार करण्यात यावा अशा सक्त सूचना शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान सोमवारी १४ ऑगस्ट रोजी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चैनी हे सावंतवाडी एसटी आगाराला भेट देणार आहेत.सावंतवाडी एसटी महामंडळाच्या आगाराची इमारत उभी राहिली पाहिजे म्हणून पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र सध्या एसटी आगाराचे अर्धवट काम झाले असून या विरोधात सर्वच राजकीय पक्षांकडून आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी स्वतः दखल घेत याबाबत मुंबई येथे ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत सावंतवाडी आणि वेंगुर्ले एसटी बस स्थानकावर पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे जलदगतीने कामे करण्याच्या सुचना मंत्री दिपक केसरकर यांनी दिल्या आहेत. सावंतवाडी आगाराचा अद्यावत आराखडा तयार करण्यात यावा तसेच तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगाराला भेट द्यावी असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी १४ ऑगस्ट रोजी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सावंतवाडीत येणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर