शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोविड काळजी केंद्रे सक्रीय करण्याची तयारी करावी : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 17:01 IST

देशात तसेच राज्यात ओमायक्रॉन तसेच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

सिंधुदुर्ग : देशात तसेच राज्यात ओमायक्रॉन तसेच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविड काळजी केंद्रे सक्रीय करण्यासाठी तयारी करावी. आवश्यक ती साधनसामग्री, वैद्यकीय सुविधा, औषधे, ऑक्सिजनचा साठा याबाबत नियोजन करा. नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी पहिला डोस 100 टक्के होण्याच्या दृष्टीकोनातून सक्रीय व्हावे. त्याचबरोबर आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.  जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांची आज बैठक झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित होते. पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने प्रयत्न करावेत. ज्या गावात पहिला डोस राहिला असेल, अशा ठिकाणी विशेष प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या, दुसरा डोस आणि 10 तारखेनंतर बुस्टर डोस देण्याच्या तयारी बाबतही नियोजन करावे. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत नियोजन करावे. संभाव्य जत्रा, यात्रांच्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट  करण्याबाबत यंत्रणा उभी करावी. जास्तीत जास्त चाचण्या वाढवाव्यात अशाही त्या म्हणाल्या.अपर जिल्हाधिकारी बर्गे आणि निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी यावेळी नियोजनाच्या दृष्टीकोनातून माहिती दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या