शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी होणाºया अत्याचाराला निर्भीडपणे वाचा फोडावी - प्राजक्ता शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:25 IST

फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे

ठळक मुद्देफणसगांव महाविद्यालयात लैंगिक अत्याचार विषयावर मार्गदर्शन

सिंधुदुर्ग : फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नाईक, महिला विकास कक्षाच्या प्रमुख दक्षता कोरगावकर, प्रा. सायली भोगटे, प्रा. सुचिता चव्हाण, अनुराधा नारकर, प्रा. सनिंद्र आचरेकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे यांनी २०१३ च्या कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या कायद्याची बाजू समजून सांगताना त्याचे फायदे आणि गैरवापर झाल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच समाजात घडणाºया  स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांविषयी अनेक उदाहरणे दिली. तसेच त्यावर कायदेशीर उपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सद्यस्थितीत सोशल मीडियामुळे होणाºया गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. महिलांनी होणाºया अत्याचाराला निर्भीडपणे वाचा फोडावी, असेही त्यांनी सांगितले. यानंतर

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नाईक यांनी महिलांनी  शारीरिक आणि मानसिक अत्याचाराविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. दक्षता कोरगावकर यांनी केले. सूत्रसंचालन अनुराधा नारकर यांनी केले. तर आभार प्रा. स्वप्नील पोळ यांनी मानले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळkonkanकोकण