शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता कोणाचीही, विरोधक सक्षमच

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

वैभववाडी नगरपंचायत : विरोधकांच्या साठेमारीत काँग्रेसची सरशी

प्रकाश काळे - वैभववाडी--नगरपंचायतीच्या निवडणुकीने वैभववाडीच्या राजकारणाचे विविध कंगोरे उलगडून दाखविले आहेत. आमदार नीतेश राणेंनी तळ ठोकल्यामुळे काँग्रेसने राखलेली पत, प्रमोद रावराणेंच्या खेळीमुळे भाजपने मारलेली मुसंडी आणि शिवसेनेत परतून जयेंद्र रावराणेंनी स्वत:च्या ताकदीवर काँग्रेसच्या नाकावर टिच्चून प्रतिष्ठेच्या दोन जागांवर मिळवलेला विजय, या बाबी वैभववाडीचे राजकारण अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आहेत. या तिघांनीही आपापल्या परीने प्रतिष्ठा जपली आहे. परंतु आघाडी न केल्याने नामुष्कीजनक पराभवाला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी इतकीच सत्तेच्या उंबरठ्यानजीक पोहोचलेल्या काँग्रेसला पक्ष आणि राणेंच्या प्रतिष्ठेची प्रभाग एकची जागा गमवावी लागली. त्याचप्रमाणे प्रभाग सहामधील मैत्रीपूर्ण लढतीत महायुतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नगरपंचायतीत सत्ता कोणाचीही येवो, विरोधक सक्षम असणार एवढे मात्र नक्की आहे.वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक विकासाच्या गप्पांपेक्षा आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे आणि काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयेंद्र रावराणे यांच्या नेतृत्वाभोवताली फिरत राहिली होती. राणेंच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपचे प्रमोद रावराणे आणि शिवसेनेच्या जयेंद्र रावराणेंनी मोजक्या कार्यकर्त्यांच्या साथीने आपल्या हिमतीवर मिळवलेले यश खरोखरच वाखाणण्यासारखे असून आमदार राणेंनी निवडणूक काळात तळ ठोकला नसता तर या रावराणे द्वयींनी काँग्रेसची काय अवस्था केली असती याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.कणकवली नगरपंचायतीची सत्ता राणेंच्या ताब्यातून संदेश पारकर गटाच्या ताब्यात गेल्यामुळे आमदार राणे यांनी संपूर्ण लक्ष वैभववाडीवर केंद्र्रीत केले होते. त्यामुळेच ते नगरपंचायतीच्या निकालापर्यंत वैभववाडीकर बनले होते. २१ दिवसांच्या येथील मुक्कामात आमदार नीतेश राणे यांनी फक्त वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करून गुप्त यंत्रणा राबवत प्रत्येक मतदाराच्या उंबऱ्याला पाय लावून मते मागितली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सात जागा जिंकून सत्तेच्या जवळपास पोहोचला आहे. मात्र, काँग्रेसला स्पष्ट बहुमतापासून रोखण्याची किमया शिवसेनेच्या जयेंद्र रावराणेंनी केली आहे.दहा महिन्यांपूर्वी राणेंपासून फारकत घेऊन स्वगृही परतलेल्या जयेंद्र रावराणेंच्या मुलास पराभूत करून आमच्यापासून दुरावल्यावर काय होते हे रावराणेंना दाखवून देत त्यांना चांगलाच धडा शिकवण्याचा चंग आमदार राणे आणि काँग्रेसने बांधला होता. परंतु जयेंद्र रावराणेंनी एका मताने आपल्या सुपुत्राच्या गळ्यात विजयाची माळ घालून राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून दिला. त्यामुळे प्रभाग एकमध्ये जयेंद्र्र रावराणेंकडून झालेला पराभव काँग्रेस पक्ष आणि खुद्द राणेंच्याही जिव्हारी लागणारा आहे. रावराणेंनी प्रभाग एक प्रमाणेच प्रभाग अकरामध्ये आपला मुत्सद्दीपणा आणि राजकीय कसब पणास लावत काँग्रेसचा पराभव करून शिवसेनेच्या संतोष पवार यांना निवडून आणले. त्यामुळे वैभववाडीच्या राजकारणात आपण आजही वाघच आहोत. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे काँग्रेसने आपली घुसमट केली होती, हेही रावराणेंनी या निकालातून दाखवून दिले आहे.काँग्रेसच्या विजयात भाजपच्या प्रमोद रावराणेंनी अडथळा निर्माण केला. रावराणेंनी आमदार नीतेश राणेंच्या राजकीय डावपेचांना छेद देत भाजपचे तीन उमेदवार निवडून आणल्याने बिनविरोध सुप्रिया तांबेसह भाजपचे संख्याबळ चारवर नेऊन नेतृत्वाची चुणूक दाखवली. प्रभाग आठमध्ये नातेसंबंधातील हक्काची सतरा ते अठरा मते असताना काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून प्रमोद रावराणेंनी मनीषा मसूरकर हिला निवडून आणत काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला. प्रमोद रावराणेंना माजी आमदार प्रमोद जठार यांचे चांगले पाठबळ लाभल्यामुळे प्रमोद रावराणेंनी प्रभाग आठ आणि बारामध्ये काँग्रेसचा पराभव करून राजकीय कौशल्य दाखवून देत सत्तेसाठी विकास आघाडीकडे हात पसरण्याची वेळ काँग्रेसवर आणली.काँग्रेसशी काडीमोड घेत स्वबळावर निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादीला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक व माजी उपसरपंच गुलाबराव चव्हाण यांच्या घरच्या मैदानात त्यांच्या कन्येला पराभूत करून आघाडी तोडल्याचा पुरेपूर वचपा काँग्रेसने काढला. खरेतर प्रभाग चार हा चव्हाण यांचा हक्काचा मतदारसंघ असल्याने या प्रभागात त्यांच्या कन्येला पराभूत करणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे व दिलीप रावराणे यांनी या प्रभागाची जबाबदारी नासीर काझी व माजी अध्यक्ष दिगंबर पाटील यांच्यावर सोपवत राजकीय खेळी खेळली होती. परंतु, काझी-पाटील या जुन्या जोडगोळीने अशक्य असलेला विजय सहज मिळवून दिला आहे. त्यामुळे जुन्यांची जोडगोळीने पक्षांतर्गत परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत पक्षाची प्रतिष्ठाही जपली आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संशयाचे ढगराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अबिद नाईक, आदी राष्ट्रवादीचे नेते नामनिर्देशनपत्र सादर करताना वैभववाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसने अपेक्षित जागा न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढवू असे जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसशी काडीमोड घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र, पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हे नेते फिरकलेही नाहीत. त्यामुळे काँग्रेसशी घेतलेली काडीमोड नेत्यांना आवडली नाही की काँग्रेसने त्यांना थांबवले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.विश्लेषण : आमदारांचे यशनगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने महायुतीशी टक्कर देत सत्तेच्या दारापर्यंत झेप घेतली. हे संपूर्ण यश आमदार नीतेश राणे यांचे आहे. त्यामुळेच प्रभाग एक, आठ, अकरा आणि बारामधील धक्कादायक पराभवातून साठे, रावराणे सहिसलामत सुटले. आमदार राणेंनी वैभववाडीत तळ ठोकला नसता तर या पराभवाचे धनी साठे, रावराणेच ठरले असते. या विजयातूनही काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे.