शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आर्थिक सुबत्तेसाठी कुक्कुटपालन करा

By admin | Updated: April 13, 2016 23:34 IST

नारायण राणे यांचे आवाहन : ओसरगाव येथे विशेष कार्यशाळा

कणकवली : जिद्द आणि मेहनत ठेवून व्यवसाय केल्यास नफा मिळविण्यामध्ये मर्यादा नसतात. कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी जिल्हा बँक नव्या दोन कर्ज योजना सुरू करीत आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आर्थिक सुबत्तेसाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.ओसरगाव येथील सिंधुदुर्ग महिला भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यंकटेश्वर हॅचरीस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कुक्कुटपालन चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विंकीस्या कंपनीचे मुख्य व्यवस्थापक डॉ. पी. जी. पेटगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पठाण, डॉ. चंदे, शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आदी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गात तरुण चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत; पण नोकऱ्या कुठे आहेत? ज्या मुलांना मुंबई-पुण्यात नोकऱ्या मिळतात, त्यांना १५ हजारांपेक्षा जास्त पगार मिळत नाही. म्हणून तरुणांनी व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. मी राजकारण करतानाच व्यवसाय देखील करत आहे. वयाच्या १४ व्या वर्षांपासून मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब जनतेने जिल्हा बँकेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. व्यवसाय करताना पिकअप शेड लागेल त्यासाठी जिल्हा बँक कर्ज देईल. आणि विंकीस्या या कंपनीच्या माध्यमातून खाद्य, औषधे देण्यात येतील. वाढलेल्या कोंबड्या त्याच कंपनीला द्याव्या लागतील. त्यातून प्रत्येक कुटुंबात आर्थिक सुबत्ता येईल. एवढी ताकद या व्यवसायात असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. डॉ. पी. जी. पेटगावकर म्हणाले, ९० हजार कोटींचा उद्योग कुक्कुटपालन या व्यवसायातून होत आहे. २०२० पर्यंत सव्वा कोटीची उलाढाल कुक्कुटपालनातून होईल. या व्यवसायात यश-अपयशाच्या दोन बाजू असतात. पण अपयशाची बाजू जास्त हायलाईट केल्यामुळे व्यवसायापासून तरुण परावृत्त होत आहेत. चांगल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कुक्कुटपालन व्यवसायात उतरल्यास अपयश येणार नाही. माणसाच्या शरीराला आवश्यक असलेल्या मांसाहाराची गरज पाहता चिकनची मागणी वाढतच राहणार आहे. या व्यवसायात शिक्षणाची अट नाही. नफ्याच्या प्रमाणाचा विचार करता कुक्कुटपालनासारखा दुसरा व्यवसाय नाही, असेही ते म्हणाले. सतीश सावंत म्हणाले, नारायण राणे यांच्या संकल्पनेतील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कटपालनसारखा व्यवसाय चांगला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुग्ध, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायांना बळ देण्यासाठी विविध कर्ज योजना जिल्हा बँकेने आणल्या आहेत. उपस्थितांचे आभार अनिरुद्ध देसाई यांनी मानले. विंकीस्या कंपनीच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्यात मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)