शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

स्थानिक नेतृत्वाची क्षमता ठरणार

By admin | Updated: November 1, 2015 00:06 IST

काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणास

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणास लागली आहे. चारही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाची क्षमता या निवडणुकीद्वारे तपासली जाणार आहे. चर्चेतील राजकारण्यांचे आप्त या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने नगरपंचायतीच्या निवडणुकीला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी निवडणूक काळात येथे ठोकलेला तळ आणि शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीने काँग्रेसवर केलेले दहशतवादाचे तर काँग्रेसने शिवसेना आणि भाजपवर केलेल्या फसवेगिरीच्या आरोपांमुळे निवडणूक चर्चिली गेली आहे. नगरपंचायतीच्या १७ पैकी ४ प्रभागातील निवडी बिनविरोध झाल्या त्यामध्ये काँग्रेस २, भाजप आणि विकास आघाडीच्या एकेका उमेदवारचा समावेश आहे. उर्वरित १२ प्रभागात काँग्रेसने तर शिवसेना भाजप आरपीआय महायुतीने १२ उमेदवार दिले आहेत. तर प्रभाग १७ मध्ये पक्ष विरहित दुरंगी लढत होत आहे. सद्यस्थितीत काँग्रेस प्लसमध्ये आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १३ प्रभागातून काँग्रेसला किमान ७ तर महायुतीला ८ नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत. आमदार नीतेश राणे यांनी वैभववाडीत ठाण मांडून बारकाईने निवडणुकीवर लक्ष केंद्र्रित केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही झटून जबाबदारीने काम केले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच निवडणूक आहे. जयेंद्र्र रावराणेंनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत परतल्यानंतरची ही पहिलीच आणि त्यातही चिरंजीवाचे राजकीय भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. तर कुशल संघटक आणि मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असलेल्या प्रमोद रावराणेंनी या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून दिले तर भविष्यात पक्ष जिल्ह्याची धुरा त्यांच्या हाती सोपवू शकतो. (प्रतिनिधी) राष्ट्रवादी नेत्यांची पाठ राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना वैभववाडीचे तोंड पाहिले. त्यानंतर माजी उपसरपंच तथा जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांच्या पाठबळावर राष्ट्रवादीची धुरा एकहाती सांभाळली आहे. राष्ट्रवादीच्या यश अपयशाचे धनी हेच असणार आहेत.