शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीबंद आंदोलन स्थगित

By admin | Updated: July 21, 2016 23:30 IST

पंकजा मुंडे यांचे आश्वासन : संघटनेची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार

सिंधुदुर्गनगरी : लिपिक कर्मचाऱ्यांचे गेले सात दिवस सुरू असलेले लेखणी बंद आंदोलन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या आश्वासनानंतर तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती लिपिक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अमित तेंडोलकर यांनी गुरूवारी रात्री उशिरा दिली.गेले सात दिवस सुरू असणाऱ्या आंदोलनाला शासनाने बेदखल केले होते. त्यामुळे गुरूवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचे सांगितले. यानुसार त्यांनी आता आर या पार अशी भूमिका घेत ठामपणे आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यभर चालु असणाऱ्या संपामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परीषद या सर्वच ठिकाणी कामे रखडलेली आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत शासनाने निवेदन करुन संप मागे घेण्याबाबत कार्यवाही करावी. अशी मागणी पॉर्इंट आॅफ इन्फॉर्मेशनद्वारे विधानसभेत आमदार वैभव नाईक यांनी केली. या मागणीची तत्काळ दखल घेऊन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सदर लिपिक कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)स्थगितीचा निर्णय तीन महिन्यांसाठी त्यानुसार ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी संघटनेशी बैठक घेतली आणि पहिल्या सात मागण्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. व उर्वरित त्यानंतर पूर्ण करण्याचे अभिवचन दिले. त्यानुसार कर्मचारी संघटनेने आपले आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेतल्याची माहिती अमित तेंडोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.