शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश चतुर्थीच्या तोंडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:11 IST

सावंतवाडी येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी गणेश चतुर्थीच्या तोंडावर दुकानदारांवर अन्याय

सावंतवाडी : येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर आला आहे. असे असताना ही दुकाने हटविणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी निवेदनातून केला आहे.या निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. या कालावधीत अनधिकृत बांधकामे तसेच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाने स्थगितीचे आदेश दिले असताना सावंतवाडी पालिकेने येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकाने हटविली.

या कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. बहुतांश छोटे व्यापारी, भाजी विक्रेते, फेरीवाले असे अनेक गरीब लोक अडचणीत सापडले आहेत.मात्र, तरीही येथील पालिकेने लॉकडाऊन काळात शासनाचे अध्यादेश झुगारून २५ ते ३० वर्षे व्यवसाय करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने अतिक्रमण केल्याचे कारण पुढे करून काढून टाकली आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच लॉकडाऊन आहे. गणेश चतुर्थी सणही काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत गरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचा हा प्रकार पालिकेने केला आहे.या कारवाईला मुख्यमंत्री म्हणून आपणाकडून तत्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती या निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्य नगर विकास मुख्य सचिव, कोकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.गाळे मालकांना न्याय द्यावा : सुनील पेडणेकरसावंतवाडीत जी दुकाने आहेत ती पूर्वीपासूनची आहेत. त्यांना आताच का हटविण्यात आले? हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला आहे. मग ही दुकाने हटवित असताना याचा तरी विचार केला गेला पाहिजे होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून दुकान गाळे मालकांना तसेच विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणीही सुनील पेडणेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गMarketबाजार