शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हाप्रळ रेती बंदर परिसरात पाच सक्शन बोटी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 23:57 IST

मंडणगड तालुक्यात महसूल विभागाची कारवाई

मंडणगड : तहसीलदार कविता जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने गुरुवारी म्हाप्रळ रेती बंदर परिसरात धडक कारवाई करून पाच सक्शन बोटी ताब्यात घेतल्या. याबाबत पंचनाम्याची कार्यवाही दिवसभर सुरू होती. तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसा व बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात गेल्या तीन दिवसांत थेट कारवाई करण्यात आली आहे.यासंदर्भात तहसीलदार कविता जाधव यांनी अधिक माहिती दिली. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ रेती बंदर परिसरात कारवाईसाठी गेल्या असताना सावित्री नदीपात्रात म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ अनेक सक्शन बोटी पाण्यात वाळू उपसा करताना आढळून आल्या. हा उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक नदीत उतरत असताना अनेक बोटी उपसा थांबवून जागेवरून गायब झाल्या, तर जागेवर सापडलेल्या पाच बोटी ताब्यात घेण्यात आल्या. म्हाप्रळ रेती बंदर परिसरात सक्शन पंपाच्या मदतीने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे गुरुवारच्या कारवाईने निष्पन्न झाले.महसूल विभागाने नदीपात्रात प्रत्यक्ष उत्खनन करताना बोटी पकडल्याने वाळू व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या भीतीने अनेक बोटी रायगड जिल्ह्यात हलवण्यात आल्या. दुसरीकडे म्हाप्रळ व आंबेत या दोन्ही गावांतील वाळू व्यावसायिक वाळू उत्खनन करीत असल्याची बाबही महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे. या कारवाईत निवासी नायब तहसीदार अनिल कांबळे, मंडल अधिकारी अनिल कुळ्ये व दशरथ पुलारे यांनी भाग घेतला़ दरम्यान, सोमवारी (दि. ४) पोलिसांनी शेनाळे घाटात रात्री उशिरा केलेल्या कारवाईत बनावट रॉयल्टीच्या आधारे दोन ब्रास अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरविरोधात एक लाख ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार डंपर मालक लुकमान चिखलकर यांना लावलेला दंड महसूल विभागाने केवळ नोटीस न बजावता प्रत्यक्षात वसूलही केला आहे़ दरम्यान, अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासनाकडून सरसकट कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहेत. (प्रतिनिधी) महसूल कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहणार एप्रिल महिन्यात तलाठ्यांना आॅनलाईन सातबारा अपग्रेडेशनच्या कामाचा भार असल्याने तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे पथक खाडीपात्रात तैनात राहणार आहे. याठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात रात्रीही कारवाई करणार असल्याचे संकेत तहसीलदार कविता जाधव यांनी दिले आहेत़ कामगारांचे पलायनमहसूल विभागाचे पथक धडक कारवाईसाठी येत असल्याचे पाहून बोटीतील सर्व कामगारांनी पाण्यात उडी मारुन घटनास्थळावरून पलायन केल्याने या बोटी नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत, या संदर्भात महसूल विभागास अधिक माहिती कळू शकलेली नाही.