शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वाफोलीत कालव्याचे निकृष्ट बांधकाम कोसळले, लाखोंचा निधी पाण्यात 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 10, 2023 12:36 IST

शेतकरी अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत

बांदा (सिंधुदुर्ग) : तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालवा अंतर्गत वाफोली गावातील दीड महिन्यांपूर्वी दुरुस्ती केलेल्या कालव्याचे बांधकाम कोसळले. लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याने जलसंपदा विभाग तोंडघशी पडला आहे. संबंधित ठेकेदाराने याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवले होते. कालवा विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केलेल्या निकृष्ट कामांबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कालवा शेतकर्‍यांसाठी, अधिकार्‍यांसाठी की ठेकेदारांसाठी ? असा खोचक सवाल वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनी उपस्थित केला.तिलारी कालवा व निकृष्ट काम हे एक समीकरणच बनले आहे. तिलारी कालवा शेतकर्‍यांसाठी की ठेकेदार व अधिकार्‍यांसाठी असा प्रश्न गेली दहा वर्षे सातत्याने उपस्थित केला जात आहे. शेती व बागायतीला तिलारीचे पाणी मिळेल या भाबड्या आशेने स्थानिक शेतकर्‍यांनी लाख मोलाच्या जमिनी अत्यंत कवडीमोलाने या प्रकल्पासाठी दिल्या. मात्र, तीन तपाचा कालावधी उलटला तरीही शेतकरी मात्र अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे.वाफोली हरिजनवाडी नजीक कालव्याची दुरुस्ती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करण्यात आली होती. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र याबाबत अंधारात ठेवण्यात आले. त्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत हे काम उरकले होते. त्यामुळे केवळ दीड महिन्यातच ही भिंत कोसळली व कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग