शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
5
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
6
Rold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
7
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
8
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
9
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
10
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
11
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
12
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
13
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
14
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
15
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
16
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
17
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
18
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
19
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
20
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्र बाटविल

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

विनायक राऊत : अर्जुन रावराणे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहाते

वैभववाडी : शिक्षण क्षेत्र हे पूर्णत: राजकारणविरहित असले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रात एवढे राजकारण घुसले आहे की, राजकारण्यांनी संपूर्ण शिक्षण क्षेत्रच बाटविले, अशी खंत खासदार विनायक राऊत यांनी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केली.वैभववाडी तालुका शिक्षण संस्था संचलित अ. रा. विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष केशवराव रावराणे, सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, संस्था संचालक सदानंद रावराणे, अधीक्षक जयेंद्र रावराणे, प्रभारी तहसीलदार तळेकर, सज्जन रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, ए. बी. मोमीन, विलास साळसकर, दामोदर रावराणे, सचिन सावंत, आदी उपस्थित होते.खासदार राऊत पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या धोरणानुसार माध्यमिकपर्यंतचे मोफत शिक्षण देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य असताना आधीच्या सरकारने शिक्षण संस्थांचे एज्युकेशनल इंडस्ट्रीकरण करून शिक्षणाचा बाजार मांडला. तरीही सामाजिक भावनेतून कोकणातील संस्थाचालकांनी कोणतेही वेतनेत्तर अनुदान मिळत नसतानाही कोकणात शिक्षणाचा बाजार होऊ दिला नाही. त्यामुळे सामाजिक परिस्थिती वेगाने बदलत असताना संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे.ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे फार कठीण काम आहे. परंतु, सामाजिक कर्तव्यभावनेतून कोकणातील संस्थाचालक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे अ. रा. विद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी निधी आपण देण्यास तयार आहोत, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शिवसेना भक्कमपणे पाठीशी : राऊतअर्जुन रावराणे विद्यालयाचा कारभार सांभाळणारे जयेंद्र रावराणे धडाडीचे कार्यकर्ते असून, ते सामाजिक भावनेतून संस्थेचे कामकाज पाहताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्यांच्या कार्याला सदैव भक्कम पाठिंबा राहील. तसेच रावराणेंच्या सामाजिक कार्याला राजकीय आधार देण्यासाठी आम्ही सर्वजण संपूर्ण प्रयत्न करू, असे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.