शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भिंत दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात, अन्य ठिकाणचे काम तूर्तास स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:46 IST

कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. दरम्यान, उड्डाणपुलाचे उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्यात यावे. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महामार्गावर २४ तास पोलिसांनी लक्ष ठेवावे व वाहतुकीचे नियोजन करावे असे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी महामार्ग प्राधिकरण व दिलीप बिल्डकॉनला दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

ठळक मुद्देभिंत दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात, अन्य ठिकाणचे काम तूर्तास स्थगित प्रांताधिकाऱ्यांचे आदेश, पावसाची संततधार सुरूच

कणकवली : कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. दरम्यान, उड्डाणपुलाचे उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्यात यावे. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महामार्गावर २४ तास पोलिसांनी लक्ष ठेवावे व वाहतुकीचे नियोजन करावे असे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी महामार्ग प्राधिकरण व दिलीप बिल्डकॉनला दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.कणकवली शहरातील उड्डाणपूल बॉक्सेलची भिंत कोसळल्यानंतर आम्ही कणकवलीकर परिवारातीच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी आदेशाची मागणी केली होती.त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री व इतरांनी स्वतंत्रपणे या घटनेच्या अनुषंगाने कार्यकारी दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करीत कारवाईची मागणी केली होती. या अर्जदारांकडून दिलीप बिल्डकॉन व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्याविरूद्ध हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३३अन्वये अंतरिम आदेश काढले आहेत.उड्डाणपुलाची संरक्षण भिंत कोसळणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना दिलीप बिल्डकॉन व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी तत्काळ कराव्यात असा आदेश प्रांताधिकारी यांनी दिला आहे. तसेच धोकादायक बनलेल्या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांव्यतिरिक्त उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्याचेही म्हटले आहे.

संबंधित परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी २४ तास देखरेख करण्यासाठी पर्यवेक्षण पथक नेमण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात ठेकेदार कंपनीकडून बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात आली. तेथे बांधकाम करून त्याखाली लोखंडी प्लेट लावून सर्व्हिस रस्त्यावरील वाहतुकीला धोका होणार नाही याची उपाययोजना करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग