शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी सज्ज! जादा गाड्यांचे नियोजन; कोणत्या गावातून किती गाड्या धावणार..जाणून घ्या

By सुधीर राणे | Updated: February 2, 2023 13:20 IST

ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध!

कणकवलीः मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून एसटीच्या १४५ बस सोडण्यात येणार आहेत. रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांनाही एसटी बस सेवा दिली जाणार आहे.भराडी देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असतात. ४ फेब्रुवारीला ही यात्रा होत असून एसटीच्यावतीने ३  ते ५ फेब्रुवारीपर्यंत बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या वतीने यंदा ३ तारीखपासून रात्री १० वाजता बस सेवा सुरू होत आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला कणकवली रेल्वे स्टेशन ते कणकवली एसटी आगार तसेच मालवण आणि आंगणेवाडी येथे जाणाऱ्या प्रवासासाठी थेट एसटी बस सेवा देण्यात आली आहे. कुडाळ आगारामधूनही ३ ते ४ फेब्रुवारीला कुडाळ रेल्वे स्टेशन ते मालवण आणि आंगणेवाडी परिसरातील प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर कुडाळ ते आंगणेवाडी २२ गाड्या, कसाल हिवाळेमार्गे आंगणेवाडी ५ गाड्या, कसाल, खोटले ते आंगणेवाडी ५ गाड्या, निरुखे, पांग्रड ते आंगणेवाडी ३ गाड्या, पणदूर, ओरोस ते आंगणेवाडी एक गाडी अशा कुडाळ येथून ३५ गाड्या धावतील. मालवण तालुक्यातील मालवण बस आगार ते आंगणेवाडी २० गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी ३ गाड्या, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी ४ गाड्या, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी, मसुरे ते आंगणेवाडी, चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी, देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी, वराड ते आंगणेवाडी, तळगाव, सुकळवाड ते आंगणेवाडी, तिरवडे, मसुरे ते आंगणेवाडी, कट्टा, कुणकुवण ते आंगणेवाडी, धामापूर ते आंगणेवाडी प्रत्येकी एक बस गाडी धावणार आहे. तालुक्यातून ४९ बसगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. कणकवली आगारातून आंगणेवाडी ३९ गाड्या, अजगणी, असरोंडी मार्गे आंगणेवाडी २ अशा ४१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी २, आचरा ते आंगणेवाडी ४, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी ३ गाड्या, तर तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी, कुडोपी ते आंगणेवाडी, आरे, निरोम ते आंगणेवाडी, आचरा, चिंदर, त्रिंबक ते आंगणेवाडी अशा एकूण १३ गाड्या धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले आजारातून पाट, परुळे (आडारी मार्गे) ते आंगणेवाडी २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष मालवण केंद्र क्रमांक १, कुडाळ आणि कणकवलीसाठी केंद्र क्रमांक २ आणि मसुरेसाठी केंद्र क्रमांक ३ तयार करण्यात आले आहे. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे.ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध!एसटी महामंडळातर्फे भाविकांसाठी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून एसटी बस हवी असल्यास तशी सुविधा एसटी महामंडळाने केली आहे.प्रवाशांना गावापासून थेट आंगणेवाडीपर्यंत जाण्यासाठी ही सुविधा आहे. यामध्ये २०० किलोमीटरला सर्वसाधारण अकरा ते बारा हजार रुपये एसटी महामंडळाकडून आकारले जातात. ही सेवा २४ तासांसाठी दिली जाते. त्यामुळे ग्रुप बुकिंगसाठी विशेष गाड्याही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग