शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मंडणगडच्या विकासाकरिता नियोजित प्रयत्न

By admin | Updated: October 30, 2015 23:10 IST

रवींद्र वायकर : मागासलेपणाचा अनुशेष भरून काढणार

मंडणगड : मंडणगड तालुक्याचा मागासलेपणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पायाभूत सुविधांसह पर्यटनस्थळाच्या विकासासाठी नियोजित प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मंडणगड येथे आलेल्या पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपायांची माहितीही दिली. मंडणगड शहराचा विकास आरखडा येथील शहरातील मतदारांच्या गरजा लक्षात घेऊन बनविण्यात येईल. मतदारांनी सेनेला सत्ता दिल्यास आगामी पाच वर्षात मंजूर आरखडा पूर्ण करण्यात येईल. यात पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पाणीप्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यात येणार असल्याचे सांगितले.शहराला तालुक्यातील विजेच्या व्होल्टज प्लक्च्युऐशनच्या समस्येवर मात करण्यासाठी थ्री फ्रेज कनेक्शन व शहरात वीजपुरवठा करण्यासाठी अंडरग्राऊंड केबलने जुने व नादुरुस्त पोल बदलण्यासाठी तालुक्यात विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ९ तालुक्यातील बसस्थानकांमध्ये सर्व सोयीसुविधा असाव्यात. त्यांचे नूतनीकरण व्हावे, यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस दलाच्या मागणीनुसार प्रत्येक तालुक्यातील सर्व चेकपोस्टमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली असल्याचे सांगितले.म्हाडाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात जागा खरेदी करून सर्वसामान्यांना परवडू शकतील, असे गृह प्रकल्प साकरण्यासाठी नियोजन सुरु असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.तालुक्यातील किल्ले मंडणगड बाणकोट व आंबेडकरांचे मूळ गाव आंबडवे यांच्या पर्यटन विकास आरखाड्यातून निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, शिल्प, लेण्या, देवस्थाने, जागृत देवस्थाने यांचे संरक्षण व संवर्धन यासाठी राज्य शासनाला पुरातत्व खात्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देताना पर्यटन व्यवसायाच्या वृ्ध्दीसाठी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, संतोष गोवळे, उपसभापती आदेश केणे, किशोर देसाई, शशिकांत मोदी, संदीप राजपुरे, अण्णा कदम, राजेंद्र फणसे, भगवान घाडगे, प्रताप घोसाळकर, रघुनाथ पोस्टुरे, दोस्त चौगुले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)वायकरांची खंत : विकास रखडलेलाचगेल्या अनेक वर्षात अगदी स्वातंत्र्यानंतरही मंडणडचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही, याबद्दल खंत व्यक्त करून वायकर यांनी भविष्यात राज्य शासनाच्या माध्यमातून या शहरात विविधांगी कामे नियोजित पध्दतीने मार्गी लावणार असल्याचे सांगितले. मंडणगड येथे आता नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे शहरासाठी विकासाचे मार्ग खुले झाले आहेत, असे वायकर यावेळी बोलताना म्हणाले.आराखडा पूर्ण करणारमंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेला सत्ता मिळाल्यास आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा बनवून तो पूर्ण करण्यात येर्ईल, असे वायकर म्हणाले.