शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:46 IST

कणकवली तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे.

ठळक मुद्देरेशनसाठी जंगलात करावी लागते पायपीटइंटरनेट मिळत नसल्याने  पॉस मशीन जंगलात ठेवून घेताहेत अंगठे

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावात बाळा वारंग हे रेशन धान्य विक्रेते आहेत. सावडाव गावठणवाडी येथील त्यांच्या दुकानावर इंटरनेटची सेवा मिळत नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी डोंगरात उभारलेल्या झोपडीपाशी जावे लागत आहे. वृद्ध ग्रामस्थांनाही सावडाव गावात रेशन धान्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.या गंभीर समस्येकडे कणकवली तहसीलदार रमेश पवार लक्ष देतील का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे. सावडाव गावठणवाडी येथे रेशन धान्य दुकान संपूर्ण गावाचे आहे. त्याठिकाणी इंटरनेट सेवा मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पॉस मशीनवर रेशन कार्डधारकाचे अंगठे घेता येत नाहीत.त्यासाठी रेशन धान्य दुकानदार बाळा वारंग यांनी गावातील जंगलमय अशा सावडाव धबधब्यानजीकच्या परिसरात प्लास्टिकचे कागद बांधून झोपडी उभारली आहे. त्याठिकाणी रेशन दुकानदार बसतात. कार्डधारकांना त्याठिकाणी जावे लागते. तिथे पॉस मशीनवर अंगठा लागला तरच धान्य दिले जात आहे.एकीकडे कोरोना महामारीत जनता होरपळली जात असताना रेशनिंगसाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने जंगलात जाऊन अंगठा लावावा लागत आहे. या समस्येने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.तसेच यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या समस्येमुळे वृद्ध तसेच गोरगरीब ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जंगलात जाऊन तेथे थांबावे लागत आहे. तसेच येणे-जाणे यात वेळ खर्ची जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामस्थांना रेशनिंग दुकानावरील धान्य घेण्यासाठी २ किलोमीटर पायपीट किंवा विनाकारण वाहन खर्च करावा लागत आहे. एकीकडे कोरोना महामारीत नागरिक त्रस्त झाले असताना पॉस मशीन डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार रमेश पवार किंवा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. तसेच त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सावडाव ग्रामस्थांनी केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता मेटाकुटीस आली आहे. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग