शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनमुळे स्वप्न सत्यात : प्रमोद कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:38 IST

बांदा : तेरेखोल नदीपात्रावरील बांदा -शेर्ले जोडणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या साकव कम पुलाचे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक तथा माजी शिक्षण ...

ठळक मुद्दे पाईपलाईनमुळे स्वप्न सत्यात : प्रमोद कामतबांदा-शेर्ले जोडणाऱ्या साकव कम पुलाचे भूमिपूजन

बांदा : तेरेखोल नदीपात्रावरील बांदा -शेर्ले जोडणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या साकव कम पुलाचे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. पुलाच्या मागणीसाठी गेली ५० वर्षे दशक्रोशीतील ग्रामस्थ प्रशासनाविरुद्ध लढा देत होते. पाईपलाईनच्या कामामुळे पुलाचे स्वप्न सत्यात उतरल्याची प्रतिक्रिया कामत यांनी दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दोडामार्ग सासोलीतून वेंगुर्लेत जात आहे. सदर पाईपलाईन बांद्यातून महामार्गावरून शेर्ले कापईवाडीतून नेण्याचा संबंधित विभागाचा प्रयत्न होता.

आळवाडीमार्गे पाईपलाईन नेल्यास पुलाचा अतिरिक्त खर्च वाढण्याचे कारण पुढे करण्यात येत होते. संबंधित विभाग प्रत्येकवेळी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने शेर्ले पंचक्रोशी व बांदा ग्रामस्थांनी अखेर आमदार नीतेश राणे यांचे याप्रश्नी लक्ष वेधले.राणे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व अभियंता यांना एक वर्षापूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवसात घटनास्थळी आणून पुलाचे महत्त्व पटवून दिले. प्रसंगी आळवाडीमार्गे पाईपलाईनचा आराखडा बदलल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर जीवन प्राधिकरणने आळवाडीमार्गेच पाईपलाईन नेण्याचे मान्य केले होते.होडीच्या जीवघेण्या प्रवासातून होणार मुक्तताबांदा सरपंच अक्रम खान व शेर्ले सरपंच उदय धुरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सदर पूलावरुन शेर्ले, मडुरा, कास, निगुडे, रोणापाल, सातोसे पंचक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे. या पुलामुळे ग्रामस्थांना होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग