शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
3
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
4
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
5
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
6
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
7
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
8
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
9
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
10
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
11
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
12
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
13
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
14
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
15
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
16
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
17
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
18
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
19
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
20
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

छायाचित्रकार निसर्गाचे सौंदर्य खुलवतो

By admin | Updated: August 19, 2014 23:52 IST

संतोष कांबळी : कणकवलीत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

कणकवली : निसर्ग हा अद्भुत घटक आणि सौंदर्यानी भरलेला आहे. ते सौंदर्य सर्वांसमोर आणण्याचे काम छायाचित्राच्या माध्यमातून होत असते. छायाचित्रकार हा निसर्गाच्या सौंदर्याचा वेगळा साक्षीदार ठरतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष कांबळी यांनी केले. नगरवाचनालय सभागृहात गंधर्व फाऊंडेशनतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभय खडपकर, अशोक करंबेळकर, गंधर्व फाऊंडेशनचे संतोष सुतार, संगर महाडिक, किशोर सोगम, गिरीश सावंत, एम.एम.मुल्ला, नितीन सावंत, तुळशीदास कुडतरकर, मोहन पडवळ आदी उपस्थित होते. सह्याद्रीचा निसर्ग आणि जैवविविधता या विषयावरील स्पर्धेतील आणि गिरीश सावंत यांची ‘इन डार्क’ या थीमवरील छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. जिल्ह्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्गातील वैशिष्टयांना सर्वांसमोर आणण्यासाठी यापुढेही अशीच स्पर्धा घेण्यात येईल, असे खडपकर यांनी यावेळी सांगितले. छायाचित्र स्पर्धेतील मुक्त गटात बांदा येथील रोहित कशाळीकर यांच्या छायाचित्राला प्रथम, कणकवलीतील विनोद दळवी यांच्या छायाचित्राला द्वितीय क्रमांक मिळाला. छंद गटात सावंतवाडी येथील डॉ.साईनाथ पित्रे यांचा प्रथम, तळवणे येथील वर्षा परांजपे यांच्या छायाचित्राला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मालवणी काव्यलेखन स्पर्धेत वागदे येथील राजस रेगे यांच्या ‘पावणेर’ कवितेला प्रथम, सावंतवाडीतील किशोर वालावलकर यांच्या ‘ईस्माईल ठाकूर’ या कवितेला द्वितीय तर देवगड येथील मंदाकिनी गोडसे यांच्या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला. वायंगणी येथील ललिता जोशी यांची ‘सड्यावरचो देवचार’ आणि नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील रंजिता दळवी हिच्या ‘शेतकऱ्याचा गाऱ्हाणा’ या कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)