शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पिसेकामते येथे गव्यांचा धुमाकूळ शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:18 IST

पिसेकामते गावठणवाडी येथे गेली  दोन वर्षे गवे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे पावसाळी तसेच उन्हाळी शेती करणे अनेक शेतकºयांनी बंद केले आहे. या गव्यांच्या उच्छादापासून आपल्याला वाचवावे अशी मागणी

ठळक मुद्दे वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

कणकवली : पिसेकामते गावठणवाडी येथे गेली  दोन वर्षे गवे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे पावसाळी तसेच उन्हाळी शेती करणे अनेक शेतकºयांनी बंद केले आहे. या गव्यांच्या उच्छादापासून आपल्याला वाचवावे अशी मागणी पिसेकामते येथील त्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

पिसेकामते गावात शेतीसाठी बाराही महिने पाणी उपलब्ध असते. त्यामुळे अंकुश गुरव, गणेश गुरव, विष्णू गुरव, राजेंद्र गुरव, प्रकाश गुरव, विजय मोहिते अशा अनेक शेतकºयांनी एकत्र येत उन्हाळी भुईमूग करण्याचे ठरविले. तसेच या पिकाबरोबरच इतर पिकांची लागवड केली. मात्र, गव्यांनी या संपूर्ण पिकाची नासधूस करून टाकली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.गतवर्षी अंकुश गुरव, विलास गुरव यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात गव्यांनी नुकसान केले होते. त्यावेळी माजी उपसरपंच ज्ञानदेव गुरव यांनी या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला दिली होती. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पार्सेकर व गुडेकर यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली होती. तसेच  पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही गव्यांचा त्रास सुरूच आहे.

तेथील  शेतकरी एकत्र येऊन हजारो रुपयांचे बियाणे घेऊन मोठ्या कष्टाने उन्हाळी शेती करीत आहेत. पण गव्याच्या त्रासामुळे शेतकºयांचे नुकसानच होत आहे. तसेच त्यांचे सर्व परिश्रम वाया जात आहेत.या समस्येकडे ज्ञानदेव गुरव यांनी वनक्षेत्रपाल सोनवडेकर यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वनकर्मचाºयांना पाठवून नुकसानीचा पंचनामा केला. मात्र, गव्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.

पिसेकामते येथील अनेक शेतकरी त्रस्त झाले असून नंदकुमार भोगले, अंकुश गुरव यांच्या काजूबागेचे तर जगन्नाथ मोहिते यांच्या चवळी, मूग यांचे नुकसानसुद्धा गव्यांनी केले आहे. गव्याच्या या त्रासामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महिलावर्ग गव्यांच्या भीतीमुळे जंगलात जाणे टाळत आहे. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे.  गव्यांच्या या समस्येवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांतून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग