शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तळवडे गाव विकासाच्या टप्प्यात

By admin | Updated: December 9, 2014 00:56 IST

राजकीय बदल फायद्याचे : बाजारपेठेचे विस्तारीकरण होणार नागरिकांना लाभदायक

रामचंद्र कुडाळकर - तळवडे गाव विकासाच्या दृष्टीने गरूडझेप घेत असून, गावातील व्यापारीकरण व बाजारपेठेचे विस्तारीकरण होताना दिसत आहे. तळवडे गाव हा सध्या विकसनशीलतेच्या प्रक्रियेत असून, हा विकास गावातील नागरिकांना लाभदायक ठरत आहे. यामुळे काही समस्यांमध्ये वाढ होत असली तरी ग्रामस्थांमधील एकी या समस्या सोडवण्यासाठी समर्थ असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत विचार करता गावच्या विकासाला मोठी चालना मिळालेली आहे. तळवडे गावचा विचार करता, या गावास कात उद्योजकांचा गाव म्हणून ओळखले जायचे. पण, सध्या या गावातील कात उद्योजकांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसेंदिवस शासन प्रणालीचे वाढते कडक नियम, कच्च्या मालाचा तुटवडा या कारणांमुळे कात उद्योजकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचप्रमाणे कातमालाच्या दरात दिवसेंदिंवस घसरण होताना दिसते. गतवर्षीचा मालही विक्रीला गेला नसल्याचे समजते. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ‘कात उद्योजकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळवडे गावातील उद्योजकांची बिकट अवस्था झाली आहे. तळवडे राष्ट्रवादीकडून सेनेकडेतळवडेतील राजकीय घडामोडींचा विचार करता, गावात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत घडामोडी झाल्या. यात जे गाव पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे, त्याच गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या संपुष्टात आली. आमदार दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक प्रकाश परब यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत केसरकर यांच्याबरोबर सेनेत प्रवेश केला. त्यामुळे तळवडे गावात आता सेनेचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. तळवडेच्या ग्रामसचिवालयावर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. पण येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारालाच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या विचारप्रणालीलाही गावात कुठेतरी फूट पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गावातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी झाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद वाढवावी लागणार आहे. तळवडे गावात आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही तयार होत आहे. पण सक्रिय नाहीत. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बदल होण्याची तीव्र शक्यता दिसते. तळवडे गावातील बाजारपेठेचे विस्तारीकरण होत आहे; पण वाहतूकदारांना, व्यापाऱ्यांना स्वच्छतागृहाचा मात्र तुटवडा भासत आहे. शासनस्तरावरून याचा विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. स्वच्छता मोहिमेच्या दृष्टीने विचार करता, तळवडे बाजारपेठेत स्वच्छतागृहाची सक्त गरज आहे.