शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तळवडे गाव विकासाच्या टप्प्यात

By admin | Updated: December 9, 2014 00:56 IST

राजकीय बदल फायद्याचे : बाजारपेठेचे विस्तारीकरण होणार नागरिकांना लाभदायक

रामचंद्र कुडाळकर-तळवडे गाव विकासाच्या दृष्टीने गरूडझेप घेत असून, गावातील व्यापारीकरण व बाजारपेठेचे विस्तारीकरण होताना दिसत आहे. तळवडे गाव हा सध्या विकसनशीलतेच्या प्रक्रियेत असून, हा विकास गावातील नागरिकांना लाभदायक ठरत आहे. यामुळे काही समस्यांमध्ये वाढ होत असली तरी ग्रामस्थांमधील एकी या समस्या सोडवण्यासाठी समर्थ असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत विचार करता गावच्या विकासाला मोठी चालना मिळालेली आहे. तळवडे गावचा विचार करता, या गावास कात उद्योजकांचा गाव म्हणून ओळखले जायचे. पण, सध्या या गावातील कात उद्योजकांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसेंदिवस शासन प्रणालीचे वाढते कडक नियम, कच्च्या मालाचा तुटवडा या कारणांमुळे कात उद्योजकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचप्रमाणे कातमालाच्या दरात दिवसेंदिंवस घसरण होताना दिसते. गतवर्षीचा मालही विक्रीला गेला नसल्याचे समजते. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ‘कात उद्योजकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळवडे गावातील उद्योजकांची बिकट अवस्था झाली आहे. तळवडे राष्ट्रवादीकडून सेनेकडेतळवडेतील राजकीय घडामोडींचा विचार करता, गावात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत घडामोडी झाल्या. यात जे गाव पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे, त्याच गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या संपुष्टात आली. आमदार दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक प्रकाश परब यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत केसरकर यांच्याबरोबर सेनेत प्रवेश केला. त्यामुळे तळवडे गावात आता सेनेचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. तळवडेच्या ग्रामसचिवालयावर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. पण येत्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारालाच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या विचारप्रणालीलाही गावात कुठेतरी फूट पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गावातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी झाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद वाढवावी लागणार आहे. तळवडे गावात आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही तयार होत आहे. पण सक्रिय नाहीत. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बदल होण्याची तीव्र शक्यता दिसते. तळवडे गावातील बाजारपेठेचे विस्तारीकरण होत आहे; पण वाहतूकदारांना, व्यापाऱ्यांना स्वच्छतागृहाचा मात्र तुटवडा भासत आहे. शासनस्तरावरून याचा विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. स्वच्छता मोहिमेच्या दृष्टीने विचार करता, तळवडे बाजारपेठेत स्वच्छतागृहाची सक्त गरज आहे. शासनाच्या प्रत्येक उपक्रमांत यशतळवडे गाव हे सावंतवाडी, वेंगुर्ले मार्गाच्या मध्यभागी येत असल्याने या गावच्या बाजारपेठेचा जोमाने विस्तार होताना दिसतो. सावंतवाडी-तुळस-वेंगुर्ले मार्गावर असणाऱ्या तळवडे बाजारपेठेचे विस्तारीकरण होत आहे. या गावचा राजकीय दृष्टीने विचार करता, गावात बऱ्याच राजकीय घडामोडी होत आहेत. त्याचप्रमाणे गाव विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.शासनाच्या विविध योजना, उपक्रम यात नावलौकिक मिळविला आहे. शासनाच्या प्रत्येक उपक्रमात या गावाने यश संपादन केले आहे. तळवडे गाव हे राज्यातील आदर्शवत गाव ठरले आहे. गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे, एकोप्यामुळे गावात विविध शासनाचे उपक्रम राबविण्यात आले होते. आताही गावात प्रत्येक उपक्रमात एक जूट दर्शविली जाते.