शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल !- वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:17 IST

रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे.

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

कणकवली : रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे. लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कार्यकर्ते आणि मतदारांना अशा प्रकारातून  दहशत दाखवली जात आहे.  मात्र,  जनता दहशतखोरांना त्यांची  जागा निश्चितच दाखवेल. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख  आमदार वैभव नाईक यांनी येथे केली. 

कणकवली येथील विजय भवन मध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते.   आमदार वैभव नाईक म्हणाले, सत्ता आणि पैसा यांच्या जीवावर राणेंची असलेली मस्ती मागील ५ वर्षात जनतेने उतरवली आहे. टोलनाका तोडफोड प्रकरण , राजन तेली यांच्या मुलाला मारहाण करणे,  संदीप सावंतना  झालेली मारहाण यावरून राणेंची वृत्ती जनतेला दिसून आली आहे.  केवळ इंग्रजी बोलण्यापेक्षा चांगले वर्तन महत्वाचे आहे.

     नितेश व निलेश राणे यांचा सत्ता आणि संपत्तीची जोड घेऊन जनतेत दहशत निर्माण करणे यात हातखंडा आहे. त्यांची ही प्रवृत्ती काही केले तरी बदलू शकत नाही. हे सर्वांनाच माहीत झाले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या मुलांना विविध पक्षात प्रवेश दिला जात आहे. मात्र, यांना कोणताच पक्ष प्रवेश देत नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.

       यापूर्वी घडलेल्या घटना पहाता त्यांच्या पक्षाचा प्रचार करणा?्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर आपली काय स्थिती होऊ शकते ? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच प्रचार करावा आणि सावध रहावे. दुस?्यांचे शिक्षण किती झाले ? उमेदवार इंग्लिश बोलतो काय? असले अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण नेमके काय करतो ? याचा आधी विचार करावा आणि त्यानंतरच दुस?्यांना उपदेश करावा .

      गेली चार वर्षे शांततेत असलेला जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. मात्र जनता त्याला भीक घालणार नाही.  निष्ठावंत शिवसैनिकांची काळजी राणे व त्यांच्या पुत्रांनी करू नये. त्यासाठी शिवसेना सक्षम आहे. मात्र, राणेंच्या पुत्रांनी अनेक निष्ठावंत कार्यकत्यार्ना दुखावले आहे. त्यामुळे ते त्यांची साथ सोडून गेले आहेत. हेही प्रथम लक्षात घ्यावे . असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला .

उध्दव ठाकरे १८ रोजी कणकवलीत !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे १८ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येणार असून त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक