शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम कारभारासाठी लोकसहभागच गरजेचा

By admin | Updated: February 11, 2016 23:50 IST

‘चिपळूण - आज अन् उद्या’ : आम्ही चिपळूणकरतर्फे आयोजित चर्चासत्रातून पुढे आलेला सूर

चिपळूण : ‘आम्ही चिपळूणकर’ आणि डीबीजे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘चिपळूण : आज आणि उद्या’ या चर्चासत्रात अभ्यासपूर्ण विचारांचे मंथन झाले. शहरातील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सभागृहात दिवसभर चाललेल्या या विचार मंथनात ‘सक्षम कारभारासाठी लोकसहभाग हवा’, असा सूर उमटला. एका बाजूला विविध सत्ताधारी पक्षांनी शासनाने जाहीर केलेला विकास आराखाडाच रद्द करा, अशी मागणी लावून धरलेली असताना या चर्चेत शहराचा आराखडा तयार करण्यात लोकप्रतिनिधी मंडळाने दिरंगाई का केली? असा प्रश्न विचारात सर्वसामान्यांच्या सुप्त भूमिकेला व्यक्त केले. चर्चासत्राचे उद्घाटन चिपळूणच्या नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांनी केले. प्रारंभीच्या सत्रात चिपळूणच्या पायाभूत समस्यांविषयी मांडणी करताना संजीव अणेराव यांनी शहरातील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची दुर्दशा आकडेवारीसह स्पष्ट केली. बी. ए. आर. सी.च्या सहाय्याने सुरु करण्यात आलेल्या ‘निसर्गऋण प्रकल्पाची वासलात का लागली?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी अधोरेखित केला. अनेक वर्षात शहराच्या सांस्कृतिक गरजांची पूर्ती का केली गेली नाही? इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या पुनर्बांधणीचा खेळखंडोबा का झाला? असे प्रश्न करत कलाकारांच्या या भूमीत कलाकार सहाय्य योजना सुरू करण्याची गरज सुहास बारटक्के यांनी व्यक्तकेली. अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुल खेळांपेक्षा अन्य कार्यक्रमासाठी वापरले जाते, हा दोष या संकुलाच्या बांधणीचा आहे, असे रमाकांत सकपाळ यांनी नमूद केले. बाजारपेठेच्या समस्येविषयी शैलेश वरवाटकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शाहनवाझ शाह यांनी भाजी मंडई, मटण मार्केट यांची बांधणी लोकाभिमुख पद्धतीने झाली नसल्याने ही बांधकामे दीर्घकाळ सडत पडली आहेत, असे प्रतिपादन केले. ‘चिपळूणचे भौगोलिक - सामाजिक पर्यावरण’ या विषयावर विवेचन झाले. डीबीजे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जी. बी. राजे यांनी चिपळूणचे भौगोलिक व पर्यावरणीय सामर्थ्य सचित्र विषद करताना हे शहर म्हणजे दुसरे काश्मीर आहे, शहराच्या या विविधांगी ऊर्जेचा साकल्याने विचार करायला हवा. सभोवती पसरलेले डोंगर, मुबलक जलस्रोत, तळी यांचा सर्वांगाने विचार करायला हवा, असे मतही त्यांनी मांडले. यावेळी पर्यावरणातील युवा अभ्यासक मल्हार इंदुलकर यांनी शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदी या नद्यांची दुर्दशा मांडताना या जलस्रोतांतील अधिवास आणि कष्टकरी मच्छिमार समाजाचा विचार आपण प्राधान्याने करायला हवा. नैसर्गिक आपत्तींला कसे सामोरे जावे, हे विषद करताना आपत्ती निसर्ग निर्माण करीत नाही, तर आपणच निर्माण करतो, हा मुद्दा माजी नगरसेवक प्रकाश काणे यांनी विषद केला. चिपळूणमधील सामाजिक एकोपा व्यक्त करताना डॉ. अल्ताफ सरगुरोह यांनी या शांतताप्रिय शहराचा नागरिक असल्याचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दात या शहराचे समृद्ध असे सामाजिक पर्यावरण विषद केले. यावेळी झालेल्या चर्चेतून अनेक सकारात्मक सूचना पुढे आल्या. सांडपाणी प्रक्रियेची तातडीची गरज असून, ही प्रक्रिया तीन-चार ठिकाणी करणे आवश्यक आहे, चिपळूण शहर बशीच्या आकाराचे असल्याने येथे भोवतालचे वायू प्रदूषण साचून राहाते. भोजनानंतरचे तिसरे सत्र चिपळूणच्या विकासाची दिशा या विषयावरचे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय रेडीज यांनी या शहराचे पूर्वापार व्यापारी पेठ म्हणून असलेले महत्व टिकविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. शकुंतला लढ्ढा यांनी शहराच्या विकासाचा विचार करताना व्यापक अर्थव्यवस्थेचे भान असणे आवश्यक आहे, असे मत मांडले. शहर नियोजन या विषयावर बोलताना मुकुंद काणे यांनी शहराचा विकास आराखडा नगरपालिकेने आजपर्यंत का तयार केला नाही? असा थेट प्रश्न विचारीत त्यामध्ये कोणाचे तरी हितसंबध लपलेले आहेत, ही बाब स्पष्ट केली. या सत्राचे सूत्रसंचालन राजन इंदुलकर यांनी केले. शेवटचे सत्र शहराच्या व्यवस्थापनात लोकांचा सहभाग, या विषयावरचे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे यांनी नगरसेवक हा लोकांचा आरसा असतो, त्यांना स्वत:च्या सेवकपदाची जाण असायला हवी. मात्र, आजचे नगरसेवक तसे नाहीत, अशा शब्दात सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका केली.ज्येष्ठ व्यावसायिक राम रेडीज यांनी नगरसेवक म्हणून आपल्याला आलेले अनुभव विषद केले, तर पत्रकार योगेश बांडागळे यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांची सध्याची दुरवस्था प्रखर शब्दात मांडली. आताच्या घटना दुरुस्तीत राज्यकारभारात नागरिकांचा सहभाग अपेक्षित धरलेला आहे. त्याचा अंमल व्हायला हवा, अशी भूमिका ऋजुता खरे यांनी यावेळी मांडली. या चर्चासत्राचा शेवट ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि चिपळूणचे सुपुत्र गजानन खातू यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. आज दिवसभर मी ही चर्चा ऐकली आणि त्यातून आजचे चिपळूण मला नव्याने समजले, असे म्हणताना नागरिकांनी स्वत: काहीही जबाबदारी न स्वीकारता लोकांनी आपल्या प्रतिनिधींकडे केवळ मागण्या मांडत राहाणे गैर आहे. त्यामुळे मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आपण लोकप्रतिनिधीना बहाल करतो, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ‘आम्ही चिपळूणकर’च्या ऋजुता खरे यांनी केले. (प्रतिनिधी)