शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सदोष सेवेपोटी गणेशकृपा डेव्हलपर्स यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 12:50 IST

 त्रुटीपूर्ण व्यवहार करुन सदोष सेवा दिल्याप्रकरणात कणकवलीतील गणेशकृपा डेव्हलपर्स यांना दंड देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला. गणेशकृपा डेव्हलपर्सचे दोन्ही भागीदार यांनी संयुक्तपणे दंड देण्याचा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रदीप निटरकर व सदस्य डॉ. अशोक सोमवंशी व श्रीमती वफा खान यांनी दिला.

ठळक मुद्देशारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाख मंचात तक्रार दाखल करण्याच्या खर्चाचे रुपये 10 हजार60 दिवसांचे आत सदनिकाचे खरेदीखत करुन द्यावे. न दिल्यास घेतलेली संपूर्ण रक्कम द.सा.द.शे 12 टक्के व्याज दराने परत करावी.

सिंधुदुर्गनगरी दि. 04 : त्रुटीपूर्ण व्यवहार करुन सदोष सेवा दिल्याप्रकरणात कणकवलीतील गणेशकृपा डेव्हलपर्स यांना दंड  देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला.

ग्राहक मंचाने गणेशकृपा डेव्हलपर्सचे भागीदार राजेंद्र माने व गिरीष नाळे यांच्याविरुध्द निकाल देवून योगेश ढवण यांना 60 दिवसांचे आत आनंदरंग रेसिडेन्सीमधील सदनिका क्र. 102 चे खरेदीखत करुन द्यावे. खरेदीखत करुन न दिल्यास  योगेश ढवण यांचेकडून घेतलेली संपूर्ण रक्कम रुपये 15 लाख 93 हजार 500 तक्रार दाखल दिनांकापासून म्हणजे दिनांक 07 डिसेंबर 2016 पासून प्रत्यक्ष रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे 12 टक्के व्याज दराने परत करावी. तसेच या संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाख व मंचात तक्रार दाखल करण्याच्या खर्चाचे रुपये 10 हजार गणेशकृपा डेव्हलपर्सचे दोन्ही भागीदार यांनी संयुक्तपणे किंवा पृथकत: द्यावे असा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रदीप निटरकर व सदस्य डॉ. अशोक सोमवंशी व श्रीमती वफा खान यांनी दिला.

            या बाबत सविस्तर माहिती अशी योगेश गणेश ढवण व  इश्वरी योगेश ढवण रा. हरकूळ ता. कणकवली या उभयतांनी गणेशकृपा डेव्हलपर्स, कणकवली यांच्याकडून आनंदरंग रेसिडेन्सी मध्ये 595 चौ. फूट क्षेत्रफळाची सदनिका क्र. 102 रुपये 15 लाख 89 हजार इतक्या किंमतीमध्ये विकत घेण्याचा साठेकरार दिनांक 20 जानेवारी 2016 मध्ये केला. सदनिका 4 ते 5 महिन्यात तयार होईल असे डेव्हलपर्सनी आश्वासन दिले होते. परंतु डिसेंबर 2016 पर्यंतही सदनिकेचे बांधकाम गणेशकृपा डेव्हलपर्स यांनी करुन दिले नाही म्हणून योगेश ढवण यांनी राजेंद्र रंगराव माने व गिरीष आनंदराव नाळे या भागीदारांविरुध्द सिंधुदुर्ग ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. 

तक्रारकर्ते  ढवण यांनी गणेशकृपा डेव्हलपर्सला सारस्वत बँक शाखा कणकवली येथून रुपये 14 लाख 15 हजार इतक्या रकमेचे कर्ज काढून पैसे दिले. तसेच इतर खर्चाचे पोटी 1 लाख 78 हजार 500  असे एकूण रुपये 15 लाख 93 हजार 500 इतकी रक्कम दिली. तरीही विरुध्द पक्ष गणेशकृपा डेव्हलपर्स यांनी तक्रारकर्त्याला रुपये 4 लाख 10 हजार इतक्या रकमेची अवास्तव मागणी करुन तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण व्यवहार करुन सदोष सेवा दिली.

00000