शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेल्स राहूदे गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर लक्ष द्या, प्रविण भोसले यांची दीपक केसरकर यांच्यावर टीका

By अनंत खं.जाधव | Updated: July 1, 2024 15:57 IST

सावंतवाडी : कोटीच्या कोटी निधीची उड्डाणे करुन आता नव्याने पंचतारांकित हॉटेलचे स्वप्न दाखविण्यापेक्षा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ...

सावंतवाडी : कोटीच्या कोटी निधीची उड्डाणे करुन आता नव्याने पंचतारांकित हॉटेलचे स्वप्न दाखविण्यापेक्षा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदा गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पहिला सोडवावा सावंतवाडीतील रूग्णालयात आवश्यक असलेला औषध पुरवठा सुरळीत करावा असे जोरदार टीकास्त्र माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रविण भोसले यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केला आहे. दोन दिवसांपुर्वी मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघात काही दिवसात पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यात येणार आहे, असा दावा केला होता.त्यावरून भोसले यांनी समाचार घेतला. भोसले म्हणाले, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी मतदार संघातील जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे. खोटी स्वप्ने दाखवायची मंत्री दीपक केसरकरांची जुनी पद्धत आहे. आताही ते तीच पद्धत वापरून निवडणूक डोळ्यासमोर ठेवत घोषणांचा पाऊस पाडणार आहेत. नुकतीच सावंतवाडीत पंचतारांकित हॉटेल निर्माण करण्याची त्यांनी घोषणा केली. मात्र आजपर्यंत केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले? असा सवाल भोसले यांनी केला.प्रत्येक घरात सेट टॉप बॉक्स, महिलांना स्वयंरोजगार, बेरोजगारांसाठी उद्योगधंदे, चष्म्याचा कारखाना तसेच सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येणार अशा कितीतरी कोटीची कोटी उड्डाणे घेणाऱ्या घोषणा यापूर्वी देखील केसरकारांनी केलेल्या असून सावंतवाडी मतदारसंघातील सुज्ञ मतदार त्या घोषणा आजही विसरलेल्या नाहीत. आता पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेल निर्माण करू या घोषणेचा निश्चितच येथील जनता स्वागत करेल. मात्र येथील सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत असून त्यांना गोळ्या, औषधे देखील पुरेसे प्रमाणात या शासनाकडून पुरविले जात नाही. अपघातग्रस्त रुग्णांना येथे पुरेश्या उपचार सुविधा नसल्यामुळे गोव्यात उपचारासाठी जावे लागते. हे गेली १५ वर्षे आमदार व आता मंत्री असलेल्या केसरकरांना दिसत नाही का? म्हणून उगाच कोटीची  उड्डाणाची घोषणा करायच्या आणि येथील जनतेचा भ्रमनिरास करायचा, हाच उपक्रम त्यांनी गेल्या १५ वर्षात अवलंबला आहे, असाही टोला भोसले यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर hospitalहॉस्पिटल