शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम तातडीने द्या : संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 15:42 IST

BankingSector Sindhudurg Sandeshparkar-सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सन २००९ पासून त्यांची येणे बाकी रक्कम मिळालेली नाही. साडेतेरा कोटींची ही रक्कम या कर्मचाऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले.

ठळक मुद्देनिवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम तातडीने द्या : संदेश पारकर सहकार मंत्र्यांना निवेदन : भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची समस्या

कणकवली : सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सन २००९ पासून त्यांची येणे बाकी रक्कम मिळालेली नाही. साडेतेरा कोटींची ही रक्कम या कर्मचाऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले.या निवेदनात म्हटले आहे की, साडेतेरा कोटींची थकीत देय रक्कम मिळावी यासाठी सिंधुदुर्ग भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. मात्र, त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.दरम्यान, २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांची देणी ही भूविकास बँकांची स्थावर मालमत्ता विक्री करून किंवा येणे कर्ज रक्कम वसूल करून अदा करावी, असे नमूद आहे. परंतु, सिंधुदुर्ग जिल्हा भूविकास बँकेची कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही. अगर पुरेशी कर्ज येणे बाकी नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग भूविकास बँक निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवू शकत नाही, अशी स्थिती आहे.जिल्हा भूविकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागविण्यासाठी राज्यातील भूविकास बँकांकडे शिल्लक असलेल्या निधीमधून विशेष बाब म्हणून रक्कम दिली जावी. त्याबाबत मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा. अशीही मागणी पारकर यांनी केली. दरम्यान, आपल्या मागणीची दखल घेऊन मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर बैठक लावण्याचे आश्वासन सहकारमंत्री पाटील यांनी दिल्याचे पारकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रministerमंत्रीsindhudurgसिंधुदुर्गSandesh Parkarसंदेश पारकर