सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांबाबत वेळोवेळी दिशाभूल नव्हे, तर फसवणूकही करीत आहे. या प्रवाशांच्या मागण्यांबाबत अनेकवेळी कोकण रेल्वे प्रशासनाला पत्रेही पाठविण्यात आली. परंतु या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याचे कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष डी. के. सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे. केवळ रत्नागिरी स्थानकावर लिफ्ट व सावंतवाडी स्थानकावरक सामान वाहतुकीसाठी ढकलगाड्या ठेवल्या म्हणजे प्रवाशांसाठी काहीतरी फार मोठ्या सोयी केल्याचा आव आणला म्हणले प्रश्न मिटला, असे कोकण रेल्वे प्रशासनास वाटते. त्यातच प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वेने दायित्व दाखविल्याचा आव आणला आहे, असेही यावेळी सावंत म्हणाले. गेली कित्येक वर्षे कोकणातील अनेक प्रवाशी या कोकण रेल्वेतून प्रवास करीत आहेत. प्रवासादरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या मागण्यांसंदर्भात अनेक वेळा आम्ही लेखी पत्रे पाठविली आहेत. यामध्ये टोल फ्री, ई-मेलचा, वेबसाईटचा, डाऊनलोडचा वापर रेल्वेवरील किती टक्के प्रवाशी करू शकतात, त्याचा कोकण रेल्वेने शोध घेतला पाहिजे. कोकण रेल्वेच्या मुख्य आॅफिससाठी नवी मुंबईला असल्याने आधीच स्टाफ कमी व त्यांच्या एचओला फेऱ्या माराव्या लागतात. शारीरिक परिणाम पाहता त्याचा परिणाम रेल्वेच्या सेवेवर निश्चितच होतो. तसेच प्रवाशांचासुध्दा एचओ गाठण्यासाठी आर्थिक, शारीरिक त्रासाप्रमाणेच वेळेचा अपव्यय होतो. गेल्या १८ वर्षात कुठल्याही रेल्वेवर वेळापत्रक व उपलब्ध फलाटांची अडचण आली नाही. केवळ कोकण रेल्वेवरच ती अडचण आली आहे. जादा गाड्या सोडताना दोन महिने जाहीर करण्याची आवश्यकता आहे. रेल्वे गाड्यांचे परिचालन नियम फक्त कोकण रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीसाठी आहेत काय,? कारण एका गाडीला तीन- तीन गाड्या केवळ ५०० किलोमीटरच्या प्रवासात ओव्हरटेक करतात. असे प्रकार अन्य रेल्वे मार्गावर डबल ट्रॅक असूनही कोेठेच दिसत नाहीत. कोकण रेल्वेच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी आहे.(वार्ताहर)उशिरा पोहोचणाऱ्या गाड्यांविषयीही अनास्थागाड्यांच्या परिचालनासाठी अधिक ट्रेक उपलब्ध होण्याच्या प्रकारामुुळे ९५ हून अधिकवेळा जर या गाड्या उशिरा पोहोचत असतील, तर त्याची दखल रेल्वेने घेणे आवश्यक आहे. गेल्या १८ वर्षात इतर रेल्वेने भंगारात काढलेले रेक कोकण रेल्वेवर का? एकतरी रेक कोकण रेल्वेवर नवीन आहे का? असा सवालही या पत्रात सावंत यांनी उपस्थित केला. कोकण रेल्वेच्या प्रवाशांची जर खरोखरच सोय पहायची असेल, तर सूर्यास्तापूर्वी कोकणात गाड्या पोहोचणे आवश्यक आहे. यामध्ये मुंबई-मडगाव, मडगाव-मुंबई, मुंबई-रत्नागिरी, रत्नागिरी-मुंबई या गाड्यांचा समावेश आहे. तांत्रिक मुद्द्यांचा बाऊ करून भारतीय रेल्वेचा अनुभव पाहता कोकण रेल्वेही अत्यंत खालच्या दर्जाची सेवा पुरवित आहे. भंगारातील रेक रंगरंगोटी व पॅच मारून वापरणे कालबाह्य रेकचे फाऊंडेशन रिकामी झाल्यामुळे प्रवासात हेलकावे व झटके बसणे आदी प्रकार होत असतात. याची परिणिती कधीतरी मोठ्या अपघातात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पत्रात म्हटले आहे. तरीसुध्दा कोकण कन्या एक्स्प्रेस आयएसओ दर्जा प्राप्त करते. हा त्या अपमान नव्हे काय, असा प्रश्न डी. के. सावंत यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रश्नांसंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना हे पत्र देऊन यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे यावेळी सावंत यांनी सांगितले.
रेल्वेकडून प्रवाशांची होतेय दिशाभूल
By admin | Updated: November 28, 2014 23:49 IST