शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

परुळेकरांचा राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध : पेडणेकर

By admin | Updated: November 17, 2015 00:01 IST

आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सिंधुदुर्गनगरी : काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे केवळ राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध दर्शवून स्थानिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. भांडणे लावण्यापेक्षा त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांना भडकविण्याचे काम करू नका अन्यथा आपल्याविरोधात आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर यांच्यासह आरोंदा ग्रामस्थांनी दिला आहे. आरोंदा जेटीसंदर्भात सोमवारी आरोेंदा ग्रामस्थ व मच्छिमारांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत नाईक, वासुदेव कोचरेकर, आनंद परब, राजेश नाईक, तुळशीदास कुबल, भगवान नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष नाईक, गोपाळ नाईक, राजाराम रेडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व मच्छिमार उपस्थित होते. तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभराहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आरोंदा येथील जेटीचे काम व्हाईट आॅर्चिड प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. या जेटीवर अनेक बेरोजगार तरुण अवलंबून आहेत. ज्यांना रोजीरोटी नाही अशांना रोजगारांची संधी जेटीच्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. मात्र गेली दोन वर्षे या जेटीसंदर्भात राजकीय संघर्षाचे वळण लागल्याने जेटीला प्रोत्साहन मिळत नाही. तरी स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा विचार करूनही जेटी चालू होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर म्हणाले की, आरोंदा जेटी झाल्यास कित्येकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या आरोंदा जेटीसंदर्भात नाहक राजकारण केले जात आहे. या राजकीय संघर्षात आरोंदावासिय, ग्रामस्थ व मच्छिमार भरडले जात आहेत. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीला मान्यता देऊन चांगले काम केले. त्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. पण काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे आरोंदा जेटीच्या कामात राजकारण करून ग्रामस्थांमध्ये तंटे लावण्याचे काम करत आहेत. (प्रतिनिधी)परुळेकरांचा राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध : पेडणेकरसिंधुदुर्गनगरी : काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे केवळ राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध दर्शवून स्थानिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. भांडणे लावण्यापेक्षा त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांना भडकविण्याचे काम करू नका अन्यथा आपल्याविरोधात आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर यांच्यासह आरोंदा ग्रामस्थांनी दिला आहे.आरोंदा जेटीसंदर्भात सोमवारी आरोेंदा ग्रामस्थ व मच्छिमारांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत नाईक, वासुदेव कोचरेकर, आनंद परब, राजेश नाईक, तुळशीदास कुबल, भगवान नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष नाईक, गोपाळ नाईक, राजाराम रेडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व मच्छिमार उपस्थित होते. तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभराहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.आरोंदा येथील जेटीचे काम व्हाईट आॅर्चिड प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. या जेटीवर अनेक बेरोजगार तरुण अवलंबून आहेत. ज्यांना रोजीरोटी नाही अशांना रोजगारांची संधी जेटीच्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. मात्र गेली दोन वर्षे या जेटीसंदर्भात राजकीय संघर्षाचे वळण लागल्याने जेटीला प्रोत्साहन मिळत नाही. तरी स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा विचार करूनही जेटी चालू होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर म्हणाले की, आरोंदा जेटी झाल्यास कित्येकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या आरोंदा जेटीसंदर्भात नाहक राजकारण केले जात आहे. या राजकीय संघर्षात आरोंदावासिय, ग्रामस्थ व मच्छिमार भरडले जात आहेत. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीला मान्यता देऊन चांगले काम केले. त्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. पण काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे आरोंदा जेटीच्या कामात राजकारण करून ग्रामस्थांमध्ये तंटे लावण्याचे काम करत आहेत. (प्रतिनिधी)