पालक गमावलेली मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:37 PM2021-07-03T16:37:40+5:302021-07-03T16:39:50+5:30

Child Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कोरोना काळात एक व दोन्ही पालक गमावलेली मुलं यांची सर्वांगीण काळजी व संरक्षण संकटग्रस्त विधवा महिलांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.

Parents should take advantage of government schemes for lost children: Mhatre | पालक गमावलेली मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : म्हात्रे

पालक गमावलेली मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : म्हात्रे

Next
ठळक मुद्देपालक गमावलेल्या मुलांसाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावाजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. सी. म्हात्रे यांनी केले आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कोरोना काळात एक व दोन्ही पालक गमावलेली मुलं यांची सर्वांगीण काळजी व संरक्षण संकटग्रस्त विधवा महिलांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. जिल्हास्तरावर अशी बालके व महिला यांच्या संदर्भातील तपशिलावर माहिती संकलनाचे काम सुरु करण्यात आले आहे. या निराधार मुलांना व विधवा महिलांना लाभ देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग यांच्याकडे संपर्क साधावा.

काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आणि संकटग्रस्त महिलांची माहिती देण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. सी. म्हात्रे यांनी केले आहे.

Web Title: Parents should take advantage of government schemes for lost children: Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.