शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर शिक्षक भरतीचा पॅटर्न कोकणात राबविणार : डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 14:25 IST

पालघर जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक तरुणांमधून करण्यात येणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या भरतीच्या धर्तीवर कोकणातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी दिली.

ठळक मुद्देपालघर शिक्षक भरतीचा पॅटर्न कोकणात राबविणार : डावखरेस्थानिक डी. एड. व बी. एड. पदवीधारकांना नोकरीसाठी कटीबद्ध

सिंधुदुर्गनगरी : पालघर जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक तरुणांमधून करण्यात येणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या भरतीच्या धर्तीवर कोकणातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी दिली.पालघर जिल्हा परिषदेने सेसफंडमार्फत जिल्हा परिषदेच्या शाळांशी संलग्न नववी व दहावीच्या वर्गावर रिक्त माध्यमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नऊ महिन्यांसाठी मासिक आठ हजार रुपये मानधनावर पदवी व बी. एड. शैक्षणिक अर्हता असलेल्या 120 उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

या निर्णयाचे आमदार डावखरे यांनी स्वागत केले आहे. तसेच पालघर जिल्ह्याव्यतिरिक्त रिक्त जागा राहिल्यास कोकणातील उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.शिक्षण विभागात दहा वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत कोकणातील स्थानिक तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.

कोकणातील स्थानिक बेरोजगार डी. एड. व बी. एड. पदवीधारकांना स्थानिक स्तरावर नोकरीसाठी आपण कटीबद्ध असल्याचे डावखरे यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीsindhudurgसिंधुदुर्गNiranjan Davkhareनिरंजन डावखरे