शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भात कापणीच्या वेळी अनेक आजार डोके वर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:32 IST

खरीप भात लावणी आणि भात कापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्वेतिहास पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकºयांना भात कापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.

ठळक मुद्देलेप्टोची भीती : शेतकरी हवालदिलबळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिकपायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा , इक्टिरोहिमोरेडिका लेप्टोचे ज्ञात जीवाणू

कडावल,11 : ग्रामीण भागात भातकापणीच्या कामास वेग आला आहे. परिणामी लेप्टो स्पायरोसिसच्या जीवाणूंचे वसतिस्थान असणाºया भात खाचरांशी आता शेतकºयांचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला आहे. जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचे बळी घेतलेल्या या रोगाचे सावट अद्याप पूर्णत: दूर झालेले नाही. खरीप भात लावणी आणि भात कापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्वेतिहास पाहता  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकºयांना भात कापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला गेल्या काही वर्षांपासून लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कणकवली तालुक्यातील काही गावांपर्यंतच मर्यादित असलेल्या लेप्टोने नंतर जिल्ह्याच्या इतर भागातही थैमान घालायला सुरुवात केली. या रोगामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लेप्टोच्या प्रभावाखाली प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता अधिक प्रमाणात आल्याचे दिसून येते. विशेषत: भात लावणी व भात कापणीच्या काळातच या रोगाचा अधिक फैलाव झाल्याचा पूर्वेतिहास असून आजपर्यंत या रोगामुळे गेलेल्या बळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिक आहे.

लेप्टो जीवाणूंचे उगमस्थान असलेल्या उंदीर, घुशींचा वावर जेथे अस्वच्छता व अडगळ असेल तेथे मोठ्या प्रमाणात असतो. तेथे त्यांनी विसर्जित केलेल्या मूत्रातील जीवाणू आसपासच्या परिसरात तसेच भात खाचरात स्थिरावतात. केवळ दोन मिली मूत्रात सुमारे दहा कोटी जीवाणूंचा अधिवास असू शकतो. यावरून याची भयानकता सहज लक्षात येते. पायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा व इक्टिरोहिमोरेडिका इत्यादी लेप्टोचे प्रमुख ज्ञात जीवाणू आहेत.

लेप्टोचा फैलाव झाला की, पौष्टिक आहार घ्या, पायात गमबूट घाला, हातमोजांचा वापर करा असे सल्ले आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून शेतकºयांना दिले जातात. मात्र एका गमबूटची किंमत आज एक हजार रूपयांच्या आसपास आहे. एवढा खर्च गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेर आहे. दरम्यान, परिसरात भातकापणीला जोरदार सुरुवात झाली आहे. शेतकरी दिवसभर भातखाचरात राबत आहेत. लेप्टोची काळी छाया अद्यापही पूर्णत: दूर झालेली नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना भातकापणी बरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावत आहे.