शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:09 IST

गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देकातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार

देवगड : गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.यावर्षी मृग नक्षत्रालाच पावसाने दमदार सुरुवात केली होती. जून व जुलै महिन्यांमध्ये भातशेती लावणीच्यावेळी मुसळधार पाऊस पडल्याने यावर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल असे वाटत असतानाच अखेरच्या टप्प्यात पावसाने सप्टेंबर महिन्यात दडी मारल्याने तालुक्यातील कातळ भागातील भातशेती करपून गेली आहे.जून व जुलै महिन्यांत मुसळधार तर आॅगस्ट महिन्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस यावर्षी झाला. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.गेली तीन-चार वर्षे तालुक्यामधील भातशेती पीक समाधानकारक मिळत होते. याचे कारण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस पडला होता. येथील भातशेती ही पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शेतीसाठी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खत विकत घेतले होते. तसेच बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळून भातशेती नांगरणीसाठी पॉवर टिलर कर्ज काढून खरेदी केले आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून कर्ज काढून घेतलेले खत व पॉवर टिलर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

आंबा पीक समाधानकारक येण्याची अपेक्षादेवगड तालुक्यात भातशेती करणारेच बहुतांश शेतकरी हे आंबा बागायतदार आहेत. भातशेती व आंबापीक धोक्यात आल्यास येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. आंबा तसेच मत्स्य व्यवसायावर येथील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच उदरनिर्वाहासाठी भातशेतीही केली जाते. यावर्षी भातशेतीचे नुकसान झाले तरी आंबा व मत्स्यपीक समाधानकारक व्हावे अशी आशा येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.नाचणी शेतीही धोक्यातपुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर मळेशेती व पानथळ जमिनीतील भातशेतीही पावसाअभावी वाया जाऊ शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. देवगड तालुक्यात काही प्रमाणात नाचणी शेतीही केली जाते. नाचणी शेतीला आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किमान तुरळक प्रमाणात पावसाची गरज असते. मात्र यावर्षी अचानक पावसाने दडी मारल्याने भातशेतीबरोबर नाचणी शेतीही वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.नुकसान भरपाईची मागणीविशेष करून तालुक्यात पुरळ, गिर्ये, वाघोटण, मुटाट, मणचे, पेंढरी, बापर्डे, नाडण, फणसगाव, तिर्लोट व पडेल या गावांमध्ये नाचणी शेती जास्त प्रमाणात केली जात आहे. सुमारे पाच हजार हेक्टरवरती तालुक्यात भातशेती केली जात आहे. तर दीड ते दोन हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते.

पावसाअभावी भात व नाचणी शेतीचे नुकसान झाल्याने कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात यावेत, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग